Mumbai News 
मुंबई

Mumbai : मुंबईत आणखी १२ ठ‍िकाणी बहरणार जंगल! PM मोंदींकडून पालिकेच्या वनीकरण उपक्रमाचे कौतुक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी मुंबई महानगरपाल‍िकेच्या 'नागरी वन उपक्रमाचे' कौतुक केले. मुंबईत आणखी १२ ठ‍िकाणी जंगलाचे संवर्धन केले जाणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

मुंबईतील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून उपक्रम हाती घेतले जातात. यासाठी महानगरपाल‍िकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत सन २०२० पासून मुंबईत तब्बल ६० ठ‍िकाणी नागरी वन (मियावाकी) तयार करण्यात आले आहे. या जंगलांमध्ये एकूण चार लाख झाडे बहरली असून, या झाडांमुळे मुंबईकरांना शुद्ध हवा मिळत आहे.

आजच्या 'मन की बात'मध्येदेखील त्यांनी महानगरपाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाच्या म‍ियावाकी जंगलांबाबत उल्लेख केला. तसेच ६० ठ‍िकाणी जंगल व‍िकस‍ित केल्याचे सांग‍ितले. स्वतः पंतप्रधानांनी या उपक्रमाविषयी कौतुक केले.

मुंबई महानगरात तब्बल ६० ठ‍िकाणी अशी जंगले व‍िकसीत केली असून त्यात चार लाख झाडे आहेत. तसेच आणखी १२ ठ‍िकाणी देखील असे जंगल तयार करण्याचे काम सुरू असून, त्याद्वारे नवीन १ लाख झाडे लावण्यात येणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी मुंबईत मियावाकी पध्दतीने मुंबईत झाडे लावण्यात आली. त्यासाठी मुंबईतील ६० हून अधिक भूखंडांची न‍िवड करण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत तब्बल ४ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत.

व‍िशेष म्हणजे या जंगलांमुळे मुंबईपासून दूर गेलेले अनेक पक्षी आणि क‍िटकांच्या प्रजाती पुन्हा परतल्या आहेत. महानगरपाल‍िकेने ही मोहीम हाती घेतल्यानंतर काही एनजीओ आण‍ि व्यावसाय‍िक संघटनांचीदेखील मदत घेतली आहे. या उपक्रमाचे जपान सरकारनेदेखील दखल घेतली असून, पत्राद्वारे कौतुक केले आहे.

वर्षभरात २५ हजाार झाडांचे वृक्षारोपण

महानगरपाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाकडून येत्या वर्षभरात मुंबईमध्ये २५ हजार झाडे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे हर‍ित मुंबईसाठीच्या महानगरपाल‍िकेच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे.

जागतिक वृक्ष नगरी

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांची दखल जागतिक स्तरावरदेखील घेण्यात आली आहे. अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशनकडून “जागतिक वृक्ष नगरी " हा अत‍िशय प्रत‍िष्ठेचा पुरस्कार सन २०२१ आण‍ि २०२२ अशी सलग दोन वर्ष मुंबई महानगराला म‍िळाला आहे. मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महानगरपाल‍िका सतत नवनवीन उपक्रम हाती घेत असते. याश‍िवाय नागरी वन उपक्रमात (म‍ियावाकी) वर्षभरात ५० हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

मुंबईची वृक्षसंपदा

पाल‍िकेच्या उद्यान व‍िभागाने आतापर्यंत नागरी वन उपक्रमात (म‍ियावाकी) चार लाख झाडे लावली आहेत. तसेच दरवर्षी पारंपर‍िक पद्धतीने २५ हजार झाडे लावण्यात येतात. त्यामुळे सध्या मुंबई शहराच्या वृक्षसंपदेने ३३ लाखांचा आकडा ओलांडला आहे. ही ३३ लाख झाडे बहरलेली द‍िसत आहेत. ठ‍िकठ‍िकाणी उद्याने व‍िकसीत केली आहेत. सध्या मुंबईकरांच्या सेवेत तब्बल १०६८ उद्याने आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT