dead body sakal
मुंबई

Mumbai : लिफ्टच्या डक मध्ये पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात रिद्धी सिद्धी ही सात मजली इमारत आहे. याच परीसरात हिमांशू याच्या वडिलांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. वडिलांनी इस्त्री केलेले ग्राहकांचे कपडे देण्यासाठी हिमांशू हा बुधवारी रात्री रिद्धी सिद्धी इमारतीत गेला होता.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - इमारतीची लिफ्ट बंद पडल्याने त्याने बाहेर निघण्यासाठी धडपड केली. मात्र त्याला बाहेर पडता आले नाही आणि सहाव्या मजल्यावरून लिफ्टच्या डकमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण मध्ये घडली आहे. हिमांशू कनोजिया (वय 13) असे मयत मुलाचे नाव आहे. वडिलांनी इस्त्री केलेले ग्राहकांचे कपडे देण्यासाठी तो गेला असता ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात रिद्धी सिद्धी ही सात मजली इमारत आहे. याच परीसरात हिमांशू याच्या वडिलांचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. वडिलांनी इस्त्री केलेले ग्राहकांचे कपडे देण्यासाठी हिमांशू हा बुधवारी रात्री रिद्धी सिद्धी इमारतीत गेला होता. चौथ्या मजल्यावरील ग्राहकांचे कपडे दिल्यानंतर तो

सहाव्या मजल्यावर जाण्यासाठी इमारतीच्या लिफ्ट ने निघाला. यादरम्यान लिफ्ट बंद पडल्याने बाहेर कसे निघायचे हे त्याला माहिती नव्हते. बाहेर निघायच्या प्रयत्न करत असताना तो सहाव्या मजल्यावरून खाली लिफ्टच्या डक मध्ये पडला. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी प्राथमिक माहिती घेत आपल्या तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT