mumbai
mumbai sakal
मुंबई

Mumbai : पश्चिम रेल्वेवर रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक; हार्बर मार्गावरील 'या' लोकल सेवा रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा कामासाठी पश्चिम रेल्वेने रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक पश्चिम रेल्वेच्या अप- डाऊन दोन्ही मार्गावर आणि अप -डाऊन हार्बर मार्गावर असणार आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द असणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी ते गोरेगाव दरम्यानच्या पुल क्रमांक ४६ च्या पुनर्गर्भीकरणाच्या कामासाठी अप आणि डाऊन दोन्ही लोकल मार्गांवर तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर १४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रविवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असणार आहे.

या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल धीम्या मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही.

याशिवाय मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. चर्चगेट ते बोरिवली स्थानकादरम्यान काही धीम्या लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील आणि परतीच्या दिशेने ही ट्रेन अंधेरीहून धावणार आहे.

या लोकल सेवा रद्द

ब्लॉककालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव दुपारी १. ५२ वाजता, गोरेगाव- सीएएसएमटी १२. ५३  वाजताची लोकल रद्द असणार आहे. ब्लॉकपूर्वी डाउन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री १०.५४ वाजता सुटेल आणि रात्री ११. ४९ वाजता गोरेगावला पोहोचेल. तर अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री ११.०६ वाजता सुटेल आणि रात्री १२.०१ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

ब्लॉक कालावधीत वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा उपलब्ध राहणार नाहीत. याशिवाय दुपारी १२.१६ आणि २. ५० वाजताची चर्चगेट- बोरिवली लोकल विरारपर्यत धावणार आहे. बोरिवलीहून दुपारी १. १४ आणि ३. ४० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द असणार आहे. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १. ४५ आणि दुपारी ४. १५ वाजता सोडण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT