Mumbai  
मुंबई

Mumbai : मुंबई महापालिका शाळेत शिपाईची १७९७ पदे रिक्त! तात्काळ पदभरतीची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई महानगरपालिकेतील शाळांत शिपाईची १७९७ पदे रिक्त आहेत. तर हमाल ३९१ आणि माळी - रखवालदार यांची १२२ पदे भरण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

पालिका शाळांत मागील अनेक वर्षापासून शिपाई, माळी तसेच रखवालदार यांची पदे रिक्त आहेत. पालिकेचा शिक्षण विभागाकडून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार शिपाईची एकूण मंजूर पदे २६३५ असून रिक्त पदांची संख्या १७९७ आहे. हमाल पदे ६०२ असून सद्या ३९१ पदे रिक्त आहेत तर माळी आणि रखवालदारांची १२२ पदे रिक्त असून मंजूर पदांची संख्या २३१ आहे.

शाळांत शिपाई पदे महत्वाची असतानाही ती भरण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असणा-या शिपाई यांच्यावर कामाचा भार येतो आहे. शाळा स्तरावर दैनंदिन कामकाज करण्यासाठीही अडचणी येतात. यावर्षी शिक्षण विभागाने निधी वाढवला आहे.

त्यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी रिक्त असलेली पदे भरणे आवश्यक आहे. गलगली यांनी पालिका आयुक्त यांना पत्र पाठवून ही रिक्त असलेली पदे तत्काळ भरण्यात यावी अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT