Gold Seized Sakal
मुंबई

Gold Seized : डीआरआयच्या कारवाईत 21 कोटींचे सोने जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

सकाळ वृत्तसेवा

महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला.

मुंबई - महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआयने मुंबईत मंगळवारी सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. डीआरआयने केलेल्या कारवाईत 21 कोटी रुपयांचे 36 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मुंबई डीआरआयच्या माहितीनुसार हे सोने परदेशातून वेगवेगळ्या हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून मुंबईत आणण्यात आले होते. डीआरआयने यासोबत 20 लाखांची रोकडही जप्त केली. सोने वितळवणाऱ्या दुकानाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.

डीआरआयच्या माहितीनुसार, मुंबई विमानतळ आणि एअर कार्गो कॉम्प्लेक्स, मुंबई मधून सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणांशी संबंधित तपासादरम्यान, डीआरआय मुंबईच्या अधिका-यांना गुप्त माहिती प्राप्त झाली. या हवाला प्रक्रियेत परदेशी नागरिकांचा समावेश असलेले एक सिंडिकेट सामील असल्याचे अधिकाऱ्यांना तपासात समजले.या माहितीआधारे सोमवार, 23 जानेवारी रोजी अधिकार्‍यांनी कारवाई केली. तस्करी केलेल्या सोन्याचे वितळणे आणि त्यावर प्रक्रिया केली जात होती त्या परिसराची झडती घेण्यात आली. या परिसराची कसून झडती घेतली असता प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर 36 किलोपेक्षा जास्त बेहिशेबी सोने जप्त करण्यात आले.

यापूर्वी 18 जानेवारी रोजी डीआरआयने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवाशांना अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून 4.54 कोटी रुपये किमतीचे 8.230 किलो सोन्याची पेस्ट जप्त केली होती. संशय येऊ नये यासाठी बहुतेक सोने प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवले होते, त्यामुळे लपवलेले सोने शोधणे कठीण झाले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT