Heroin Drugs Sakal
मुंबई

मुंबई विमानतळावर 35 कोटींचे अमली पदार्थ जप्त; केनियन नागरिक अटकेत

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने डीआरआयने शुक्रवारी रोजी 35 कोटी रुपयांच्या 4.98 किलो हेरॉईनसह एका प्रवाशाला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने डीआरआयने शुक्रवारी रोजी 35 कोटी रुपयांच्या 4.98 किलो हेरॉईनसह एका प्रवाशाला अटक केली.

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने डीआरआयने शुक्रवारी 11 नोव्हेंबर रोजी 35 कोटी रुपयांच्या 4.98 किलो हेरॉईनसह एका प्रवाशाला अटक केली.

डीआरआयला एका प्रवाशामार्फत अमली पदार्थ तस्करी करण्याचा तयारीत असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर अधिकार्‍यांनी विमानतळावर पाळत ठेवली होती. केनिया देशाच्या नैरोबी येथून मुंबईला जाणाऱ्या एका व्यक्तीला तपासणी दरम्यान अडवण्यात आले. त्याच्या सामानाची झडती घेतली असता, अधिकाऱ्यांनी एका ट्रॉली बॅगमध्ये 4.98 किलो हेरॉईन आल्याचे आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रॉली बॅगमध्ये तयार केलेल्या छोट्या पोकळीखाली लपवून ठेवलेल्या काळ्या पॉलिथिनच्या पिशवीत अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आला होता, त्यामुळे तपास यंत्रणांना शोधणे कठीण होते. आरोपी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा भाग आहे का आणि हे अमली पदार्थ भारतात कुठे आणि कोणाला हस्तांतरीत करायचे होते या मार्गाने पोलीस तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT