Jitendra Awhad and Shivsena
Jitendra Awhad and Shivsena 
मुंबई

Mumbai: ...तर रस्त्यावर उतरू देणार नाही; शिंदे गटाच्या जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली - धर्मवीर आनंद दिघे यांना जामिनासाठी शरद पवार यांनी मदत केली. पवारांनी ठरवलं असतं तर आनंद दिघे टाडाच्या बाहेर आले नसते असे वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्याचा डोंबिवलीत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निषेध करण्यात आला आहे.

आव्हाडांनी बोलताना विचार करावा, पुन्हा असे कृत्य केल्यास रस्त्यावर उतरु असे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासोबतच शिवसेनेची शिल्लक सेना असा ठाकरे गटाचा उल्लेख करत कुठेतरी तुम्ही लाज बाळगा आणि निषेध करा असे खुले आव्हान ठाकरे गटाला केले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आव्हाड यांनी आनंद दिघे यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने शिंदे गटाकडून सर्वत्र त्यांचा निषेध व्यक्त केला जात आहे. डोंबिवली शिवसेना शहर शाखा कार्यालयात पत्रकार परिषद घेत पदाधिकाऱ्यांनी आपले म्हणने मांडल. डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील यांसह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र यांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवार यांच्यामुळेच आनंद दिघे यांचे टाडातून सुटका झाली असं विधान केलं होतं. आव्हाड यांनी बोलताना विचार करावा. इथून पुढे पुन्हा त्यांनी असे वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा त्यांनी दिला. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिल्लक सेना असा उल्लेख करत धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण तुम्ही सोडली आहे.

मुस्लिम धार्जिने धर्माचे राजकारण करतात अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून राजकारण करता. कुठेतरी तुम्ही लाज बाळगली पाहीजे. दिंघेंविषयी असे वक्तव्य करणाऱ्यांचा जाहीर निषेध करा असे खुले आव्हान शिंदे गटाने ठाकरे गटाला दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT