BMC Rajawadi Hospital File Photo
मुंबई

धक्कादायक! राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा

प्रशासनाचे चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : घाटकोपर (Ghatkopar) येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर असलेल्या एका रुग्णाचा डोळा उंदराने कुरतडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. (Mumbai a rat bit the eye of patient at Rajawadi Hospital)

कुर्ला कमानी येथे राहणाऱ्या श्रीनिवास यल्लपा या २४ वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेंदूज्वर आणि किडनीचा त्रास असल्याने या रुग्णाला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धावपळ करून हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. डोळ्यांची तपासणी केली असता उंदराने डोळा कुरतडल्याचे समोर आले.

डोळ्यांना कसलीही इजा झालेली नाही

अतिदक्षता विभाग हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून याबाबत सुरक्षेचे उपाय करत असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. चार वर्षापूर्वी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात असाच प्रकार घडला होता. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला होता. आता पुन्हा राजावाडी रुग्णालयातील असाच प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता डोळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र, त्या रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्यांखाली उंदराने कुरतडल्याचे निदर्शनास आले. मात्र, हा प्रकार गंभीर आहे.

या घटेनेच्या चौकशीचे दिले आदेश

या प्रकाराबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "अतिदक्षता विभागातील तळमजल्यावर असला तरी हा विभाग सर्व बाजूने बंद आहे. पावसाळा असल्याने दरवाजामधून तो उंदीर आत गेला असावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT