Mumbai ac Local esakal
मुंबई

Mumbai Local : एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड! मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० च्या सुमारास झाला बिघाड. मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीचे वाजले तीन तेरा.

सकाळ वृत्तसेवा

मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० च्या सुमारास झाला बिघाड. मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीचे वाजले तीन तेरा.

मुंबई - मध्य रेल्वेच्या कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० च्या सुमारास बिघाड झाला होता. परिणामी, जलद मार्गावरील मेल-एक्स्प्रेससह जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे.

कोपर स्थानकात अंबरनाथ-सीएसएमटी वातानुकूलित जलद लोकलमध्ये शनिवारी रात्री ८.२० च्या सुमारास बिघाड झाला होता. यामुळे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच, इतर लोकल इच्छित स्थानकात ३० ते ४५ मिनिटे उशिराने पोहचत होत्या. तसेच, अनेक लोकल रद्द करण्यात आल्याने एका लोकलमध्ये दोन ते तीन लोकलमधील प्रवाशांची गर्दी जमली होती.

दरम्यान, रात्री १०.३० च्या सुमारास रिकामी वातानुकूलित लोकल मार्गावरून हटवून कारशेडमध्ये नेण्यात आली. तसेच जलद मार्गावरील लोकल सेवा सुरळीत करण्यात आली. मात्र, जलद मार्गावरील वाहतूक जवळपास दोन तास खोळंबल्याने लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT