accident mumbai esakal
मुंबई

Mumbai Accident : घोडबंदर रोडवर केमिकल टँकर उलटून अपघात

जेएनपीटी येथून गुजरात, सुरत येथे २५ टन वजनाचा केमिकल टँकर घेऊन चालक मोहम्मद साकिर हा घोडबंदर रोडमार्गे निघाला होता.

सकाळ डिजिटल टीम

ठाणे - टॉल्युएन केमिकल घेऊन जाणारा टँकर घोडबंदर रोडवरील पातलीपाडा पुलाखाली उलटल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. तीन तास वाहतूक कासवगतीने सुरू होती.

वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी साधारणपणे पहाटे चार वाजले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. जेएनपीटी येथून गुजरात, सुरत येथे २५ टन वजनाचा केमिकल टँकर घेऊन चालक मोहम्मद साकिर हा घोडबंदर रोडमार्गे निघाला होता. पातलीपाडा पुलाजवळ येताच चालकाचा टँकरवरील ताबा सुटून अपघात झाला.

याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, चितळसर पोलिस, शहर वाहतूक पोलिस, एमएमआरडीए कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. अपघात झाल्याने घोडबंदर रोडवरील वाहतूक तीस तास धीम्या गतीने सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT