accident mumbai esakal
मुंबई

Mumbai Accident : भरधाव ट्रकने टेम्पोला दिली धडक ; चालकाचा जागीच मृत्यू !

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Accident : गांधारपाले गावाजवळ भरधाव ट्रकने टेम्पोला धडक दिल्याने टेम्पोचालकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हा अपघात घडला.

टेम्पोचालक वैभव राजाराम बेनकर (३२, रा. रत्‍नागिरी) हा गोवाहून मुंबईकडे जात होता. महाड तालुक्‍यातील गांधारपाले येथे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने टेम्पोला समोरून जोरदार धडक दिली. अपघातात टेम्पोचालक वैभव यांचा मृत्यू झाला आहे तर त्याचा सहकारी मनीष श्यामसुंदर मस्के (३२, रा. संगमेश्‍वर) जखमी झाला आहे.

अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून टेम्पोचालकाला महामार्ग पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने टेम्पोतून बाहेर काढून महाडमधील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचा तपास महाड शहर पोलिस ठाण्यामार्फत सुरू आहे.

अवजड वाहनांचे रात्री मार्गक्रमण

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना बंदी केल्यानंतर रात्री उशिरा ही वाहने मार्गक्रमण होतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्ण आहे, दिशादर्शक फलक आणि धोकादायक वळणे रात्री नीट दिसत नसल्यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT