Marathi Board Sakal
मुंबई

मुंबई : मराठी पाट्या नसणार्‍या दुकानांवर दस-यानंतर कारवाई

मुंबईत मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने, आस्थापनांवर दस-यानंतर म्हणजे गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने, आस्थापनांवर दस-यानंतर म्हणजे गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारणार आहे.

मुंबई - मुंबईत मराठी पाट्या नसणाऱ्या दुकाने, आस्थापनांवर दस-यानंतर म्हणजे गुरुवारपासून कारवाईचा बडगा उगारणार आहे. मंगळवारी याबाबतचा अॅक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत सुमारे पाच लाख दुकाने, आस्थापना असून त्यापैकी ५० टक्केच दुकानांनी मराठी पाट्यांचा नियम अमलात आणला आहे. मात्र, आता उर्वरित सुमारे दोन ते अडीच लाख दुकानांवर गुरुवारपासून कारवाई करण्याची तयारी पालिकेने केली आहे. यापूर्वी २०१८ च्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असणाऱ्या दुकानांवर मराठी पाट्या बंधनकारक होते. पण, नव्या नियमानुसार कर्मचार्‍यांची संख्या विचारात न घेता मराठी भाषेतच फलक असणे बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१) च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनास कलम सातनुसार मराठी भाषेतून नामफलक लावणे बंधनकारक आहे. मात्र, मुदत वाढ देऊनही अनेक दुकानांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पालिकेचे पथक मुंबईभर दुकानांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाच्या ७५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चमू तयार केला आहे. मुंबई पालिकेच्या सर्व २४ विभागात  होणार्‍या कारवाईत दुकानांवर मराठी पाटी न आढळल्यास दंड आकारला जाईल. त्यावेळी, दंड न भरल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पालिकेच्या संबंधित अधिका-य़ाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT