Crime sakal
मुंबई

Mumbai : अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका! लवकरच भारतात परतणार..

आपल्या नोटमध्ये तुरुंगात अनुभव सांगताना क्रिसनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. तुरुंगात असताना तिला कपडे धुवायच्या डिटर्जंटने केस धुवावे लागत होते. तसेच जेलच्या आत टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून कॉफी बनवावी लागल्याचं अभिनेत्रीने नोटमध्ये म्हंटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री क्रिसन परेराची गुरूवारी शारजाहच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. क्रिसन परेराला या महिन्याच्या सुरुवातीला यूएईच्या शारजाहमध्ये ड्रग्जच्या तस्करीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.

क्रिसन परेराने यूएईमध्ये ड्रग्ज प्रकरणात जवळपास एक महिना तुरुंगवास भोगला आहे. लवकरच क्रिसन भारतात परतणार असल्याची माहिती मिळत आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर क्रिसनने एक भाउक नोट शेअर केली.या नोटमध्ये तुरुंगात असताना तेथील परिस्थितीचा आढावा तिने मांडला.

मोठ्या खेळाचे छोटे प्यादे

आपल्या नोटमध्ये तुरुंगात अनुभव सांगताना क्रिसनने अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. तुरुंगात असताना तिला कपडे धुवायच्या डिटर्जंटने केस धुवावे लागत होते. तसेच जेलच्या आत टॉयलेटमधील पाण्याचा वापर करून कॉफी बनवावी लागल्याचं अभिनेत्रीने नोटमध्ये म्हंटले आहे.

तिच्या भावाने केविन परेराने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या हाताने लिहिलेल्या संदेशाची नोट शेअर करत क्रिसनला सामोरे जावे लागत असलेल्या परिस्थितीची माहिती दिली. "या घाणेरड्या खेळात मी फक्त एक प्यादा असल्याचे तिने नोटमध्ये सांगितले आहे. नोटमध्ये क्रिसन परेरानी आपल्या फॅन्सचे आभार देखील मानले आहे.

कुटुंब आनंदी

क्रिसनचा भाऊ केविन परेरा याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे . या विडिओत शारजाह तुरुंगातून सुटल्यानंतर क्रिसनशी व्हिडिओ कॉलवर बोलत असताना त्यांची आई आनंद साजरा करताना दिसत आहे.

केविनने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले, "क्रिसन आता तुरुंगातून मुक्त झाली आहे!!! ती पुढील 48 तासांत भारतात परतेल." व्हिडिओमध्ये आई आणि कुटुंबातील इतर सदस्य तिच्याशी बोलत असताना अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले होते.

प्रकरण थोडक्यात

या वर्षी मार्चमध्ये टॅलेंट कन्सल्टंट म्हणून आरोपींनी क्रिसेन परेराची आई प्रेमिला यांच्याशी संपर्क केला . आरोपींनी एका वेबसिरीजच्या "ऑडिशन" साठी यूएई देशाच्या शारजाह शहरात जाण्यासाठी सांगितले.

त्यावर अभिनेत्रीने तयारी दर्शवली आणि दुबईकडे निघाली. परंतु महिलेला पाठवताना तिच्या नकळत सामानात अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी आरोपींनी लपवले होते. शारजाह येथे पोहोचल्यावर अभिनेत्री परेराला अमली पदार्थ तस्करी प्रकरणात तेथील तपास यंत्रणांनी अटक केली. या नंतर 1 एप्रिलपासून क्रीसेन परेरा शारजाह येथील तुरुंगात होती अखेर तिची सुटका झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Kharadi Accident : पुण्यात भीषण अपघात ! विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक, तरुणासह चिमुकला ठार; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

Whatsapp Update : व्हॉट्सॲपमध्ये येतय नवीन ‘स्कॅम अलर्ट’ फीचर; फसव्या मेसेजचा लगेच मिळणार अलर्ट, पाहा कसं वापरायचं?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये गेवराईत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Gold Rate Today: सोनं पुन्हा स्वस्त! सलग सहाव्या दिवशी भाव घसरले; महाराष्ट्रातील आजचा सोनं-चांदीचा दर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT