Mumbai esakal
मुंबई

Mumbai : तब्बल 88 वर्षानंतर श्रीज्ञानेश्वरदर्शन’ होणार पुनर्प्रकाशित

मराठी भाषा दिनानिमित्त ३५ पुस्तकांचे प्रकाशन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून तब्बल 88 वर्षानंतर दुर्मिळ असलेल्या ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ (भाग पहिला) दर्शन प्रवेश व साहित्य खंड व ‘श्रीज्ञानेश्वरदर्शन’ (भाग दुसरा) अध्यात्म खंडाचे पुनर्प्रकाशित केले जाणार आहे. त्यामुळे संत साहित्याच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेले हे दुर्मिळ ग्रंथ राज्यातील वाचक, पुस्तक प्रेमींच्या हाती उपलब्ध होणार आहेत.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सोमवारी, 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता मंडळामार्फत मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या श्रीज्ञानेश्वरदर्शन ग्रंथाचे प्रकाशन केले जाणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली. यासोबतच वैविध्यपूर्ण अशा विषयांवरील ३५ ग्रंथाचे प्रकाशनही केले जाणार आहे.

मंडळाकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या इतर ग्रंथामध्ये श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला असून या प्रकल्पाचे संपादन डॉ.विश्वास पाटील यांनी केले आहे. सदर प्रकल्पातील ‘श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड 1 - गीता तत्त्वबोध : कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोगʼ व ‘श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्मय खंड 2 - पातंजल योग दर्शन व ब्रह्मसूत्र शांकरभाष्य विवेचन (चार अध्याय)’ हे दोन खंड मंडळाकडून प्रकाशित केले जाणार आहेत.

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत यांचे आणि त्यांच्या कवितांचे अंतरंग समीक्षकाच्या निकोप दृष्टीने उलगडून दाखविण्याचे काम थोर समीक्षक व.दि.कुलकर्णी लिखित ‘केशवसुतांचे अंतरंग’ या पुस्तकात केले असून सदर ग्रंथ मंडळाच्यावतीने वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

यासोबतच विनायक त्र्यंबक पाटील यांनी लिप्यंतर केलेल्या ‘महानुभाव सांकेतिक वज्र लिपी (पोथींसह-लिप्यंतर)’ व ‘महानुभाव सांकेतिक कवीश्वरी लिपी (पोथींसह-लिप्यंतर)’ ही दोन ग्रंथ, ‘होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास’, ‘अहिल्याबाई होळकर गौरवगाथा लोकमातेची’ (खंड 8) ‘होळकर रियासत काव्यायान’ (खंड 9) हा संकलनात्मक ग्रंथ, ‘सुभेदार थोरले मल्हारराव होळकर’ (खंड 10) हे चरित्रपर पुस्तक असे पाच खंड मंडळाकडून प्रकाशित केले जाणार आहेत.

तसेच ‘दानशूर महाराजा सयाजीराव’ व ‘महाराणी जमनाबाई साहेब गायकवाड यांचे चरित्र, डॉ.वसु भारद्वाज यांनी संपादित केलेले ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आणि विचारदर्शन खंड 1’, ‘तत्त्वज्ञान आणि नीती खंड 2’ व ‘नीतित्त्वज्ञान राजकीय आणि सामाजिक खंड 3’ हे तीन खंड,‘कृषी संवादक महात्मा फुले’‘गौतमीमाहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार हुतात्मा वीर भाई कोतवाल’,महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापुराव’ आदी अनेक पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT