Ashwini Vaishnav Sakal
मुंबई

PM मोदींच्या स्वप्नातील मुंबई-अहमदाबाद प्रकल्प ठाकरेंमुळे रखडला; रेल्वे मंत्र्यांचे थेट आरोप

हा प्रकल्प २०२३ मध्येच पूर्णत्वास येणार होता.

सकाळ डिजिटल टीम

Railway Minister Ashwini Vaishnav Allegation On Uddhav Thackeray : PM मोदींच्या स्वप्नातील देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडला, असा थेट आरोप रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी केला आहे. शिंदे-भाजप सरकारनं परवानग्या दिल्यानं प्रकल्पाला गती आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हा प्रकल्प २०२३ मध्येच पूर्णत्वास येणार होता. मात्र, या प्रकल्पाच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नसल्याचेही ते म्हणाले. वैष्णव यांच्या या आरोपांमुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार असून, या आरोपांना ठाकारे गट काय उत्तर देतं हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात बुलेट ट्रेनच्या विविध कामांना आवश्यक असलेल्या परवानग्या उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात देण्यात आल्या नाहीत. मात्र, सत्तातर होताच शिंदे-फडणवीस यांनी या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकल्पाला गती मिळणार आहे.

यावेळी वैष्णव यांनी काल अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींबाबतही भाष्य केले. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.41 लाख कोटींची भांडवली तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत हायस्पीड ट्रेन, बुलेट ट्रेन आणि नवीन ट्रॅकवर भर दिला जाणार असून, यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : कोयना धरणात 24 तासांत 3.90 TMC पाण्याची आवक! 67 टीएमसीचा टप्पा पार, महाबळेश्वर-नवजात मुसळधार; पाहा आजची ताजी आकडेवारी

जितेंद्र यांनी विकत घेतलेला 4.25 लाखांना बंगला, आज त्याची किंमत 450 कोटी, जितेंद्र यांची मास्टरस्ट्रोक डील

Latest Marathi Update : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी जंतर-मंतरवर दाखल

Satara Loan Waiver: सातारा जिल्ह्यात ५४ हजार खाती कर्जमुक्तीकडे; बॅंकांमधील माहिती पोर्टलवर अपलोड, ५६९.४० कोटी होणार माफ

IND vs ZIM, T20I: 'Vaibhav Sooryavanshi ने चूका सुधारण्यावर लक्ष दिले असेलच, त्यामुळे...' श्रेयस अय्यरचे मोठे विधान

SCROLL FOR NEXT