Mumbai-Ahmedabad Bullet Train:  sakal
मुंबई

Mumbai-Ahmedabad Bullet Train: बुलेट ट्रेनच्या कामाला येणार वेग ; महत्वाचा टप्पा झाला पूर्ण

सकाळ डिजिटल टीम

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम दोन्ही राज्यांत वेगात सुरू आहे. दोन्ही राज्यांतील जमीन अधिग्रहण ९९.९५ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली.

एनएचआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण ९९.९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यापैकी गुजरातमध्ये १०० टक्के भूसंपादन झाले आहे; तर महाराष्ट्रात ९९.८३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी एकूण १,३८९.४९ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.

यापैकी गुजरात राज्यात ९५१.१४ हेक्टर, दादरा-नगर हवेलीमध्ये ७.९० हेक्टर; तर महाराष्ट्रात ४२९.७१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. उर्वरित ०.२७ टक्के जमीन अधिग्रहणाबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच ही जमीन प्रकल्पासाठी मिळेल.

महाराष्ट्रातील ठाणे येथील डेपोच्या कामासाठी मोठ्या मशिनरी जाण्यासाठी लागणाऱ्या एका अप्रोच मार्गाची आवश्यकता आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाबाबत नोटिफिकेश जारी झाले असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील स्थानकाचे काम सुरू झाले आहे; तर या मार्गातील एकमेव भुयारी मार्गाचे काम मुंबईत बीकेसी येथे सुरू झाले आहे.

नुकताच सर्वांत मोठा स्टील ब्रिज उभारून प्रकल्पांचा महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे. एका माऊंटन टनेलचे कामही पूर्ण झाले आहे. भारतातील पहिला समुद्रातील बोगदा या मार्गासाठी बांधण्यात येणार आहे. तो बीकेसी ते शिळ फाट्यादरम्यान ठाणे खाडीतून बांधण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Hike: पेट्रोल ₹5 तर डिझेल 3 रुपयांनी महाग! नवे दर लागू; महाराष्ट्रात 1 लिटर आता कितीला?

Mumbai News: ठाणे-बेलापूर मार्गावर चार रात्री वाहतूक बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

‘सोबत राहा, महिन्याला स्टायपेंड देतो’; विवाहित निर्मात्याची रेणुका शहाणेंना विचित्र ऑफर, प्रस्ताव ऐकून अभिनेत्रीला बसला धक्का

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंच्या 'गर्जना' मोर्चाला शेकापचा पाठिंबा

Dudhna Dam : निम्न दुधना’तून पाणी उपशावर बंदी साठा २० टक्क्यांपेक्षा कमी, प्रशासन ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT