मुंबई

अपघातात बळी गेल्यावर सरकारला जाग येणार का? मुंबई - अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांमुळे ठरतोय जिवघेणा

संदीप पंडित

भाईंदर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यातच शहरात आणि मुंबई-अहमदाबाद मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले झाले आहे. त्यामुळे प्रशासनापुढील डोके दुखी वाढली असून, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावरील झाकणे तुटल्याने आणि गायब झाल्याने याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

दहिसर टोल नाक्‍यावरून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद मार्गांवर मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वे सेवा बंद असल्यामुळे नागरिक बस, चारचाकी आणि दुचाकी वाहनाचा वापर करत आहेत. परंतु अशा परिस्थितीत मुख्य मार्गावरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण पसरल्याने वाहनांना मार्ग काढणे अवघड जात आहे. त्यातच मेट्रोच्या कामाकरिता अर्धा रस्ता व्यापला गेल्याने या मार्गांवर आता प्रवाशांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पालिका प्रशासन आणि मेट्रो यांच्यातील हद्दीचा वादामुळे रस्त्याची दुरुस्ती रखडल्याचे बोलले जात आहे. 

नागरिकांचा जीव मुठीत धरून प्रवास 
महामार्गावर खड्ड्याच्या समस्येसह नाल्यावरील उघड्या झाकणाची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. गेल्या महिन्यात नाल्यावर झाकण नसल्यामुळे एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील उघड्या नाल्यावर झाकणे बसवण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी दिले होते. परंतु अद्यापही शहरातील अनेक भागातील झाकणे बसवण्यात न आल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. 

मुंबई-अहमदाबाद मार्गांवर मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे तो रस्ता एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आला आहे. एमएमआरडीए ने रस्त्यावरील खड्डे आणि झाकणे लावणे अपेक्षित आहे. आम्ही याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहोत. 
- दीपक खांबित,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. 

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT