रखमाबाई पाटील sakal
मुंबई

Mumbai : धावत्या एक्सप्रेसवर दगड भिरकावला, महिलेच्या डोळ्याला दुखापत

आंबिवली शहाड रेल्वे स्थानकाजवळील घटना

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : लोकल, एक्सप्रेसवर दगड भिरकावून प्रवाशांना जखमी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कळवा, वांद्रे येथील घटनेनंतर आता आंबिवली शहाड रेल्वे स्थानका दरम्यान राज्यराणी एक्सप्रेस वर दगडफेक झाल्याने यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या महिलेच्या डोळ्याला मार लागला असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

रेल्वे रुळांजवळील झोपडपट्टी परिसरातून अनेकदा लोकल, मेल एक्सप्रेसवर दगड भिरकावले जातात. प्रवाशांजवळील सामान पडून ते चोरी करता यावे या उद्देशाने अनेकदा ही दगडफेक होते. 7 नोव्हेंबर ला ठाणे कळवा दरम्यान लोकलवर दगडफेक केल्याने यामध्ये प्रवाशाच्या नाकाला दुखापत झाली होती. त्यानंतर माहिम ते वांद्रे दरम्यान जलद मार्गावरील लोकलवर दगडफेक झाल्याने तरुणीच्या कपाळावर मार लागला होता. याच महिन्यातील या घटना असून तिसरी घटना ही आंबिवली ते शहाड रेल्वे स्थानका दरम्यान घडली आहे.

नांदेडहून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणारी राज्यराणी एक्सप्रेस ही सकाळी 8.30 च्या दरम्यान आंबिवली स्थानकाजवळून जात असताना एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या रखमाबाई पाटील (वय 55) यांच्या डोळ्याजवळ दगड लागल्याने त्या जखमी झाल्या. कल्याण रेल्वे स्थानकात एक्सप्रेस थांबल्यानंतर त्यांना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. रखमाबाई या दिवा येथे रहात असून त्या नांदेडहून दिवा येथे येण्यासाठी आपल्या परिवारासह या एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या.

याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी दिली.

आंबिवली येथे इराणी वस्ती असून चोरांचा मुक्काम या वस्तीत असतो. आंबिवली शहाड रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडलेली असल्याने चोरी, लुटीच्या उद्देशानेच ही झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT