Mumbai News Esakal
मुंबई

Mumbai News : अंधेरीत गावठी दारु प्यायल्यामुळे एकाचा मृत्यू, चौघांची प्रकृती चिंताजनक

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस परिसरात धक्कादायक घटना आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. गावठी दारु प्यायल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. गावठी दारु प्यायल्यामुळे या चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. गावठी दारु पिऊन विषबाधा झाल्याने एकाचा मृत्यू झालेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीतील पंप हाऊस परिसरात एका घरामध्ये पाच कामगार राहत होते. त्यांना मंगळवारी (15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनाची सुट्टी होती. ड्राय डे असूनही कामगार गावठी पिऊन घरी आले आणि त्यानंतर झोपून गेले. त्यानंतर हे चौघे कामगार 15 ऑगस्टच्या संध्याकाळी झोपल्यानंतर काल दिवसभर त्यांनी दरवाजा उघडला नाही म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केला.

यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन दार उघडलं. त्यावेळी एक कामगाराचा मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं. तर चार कामगारांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे कामगार 18 ते 20 वर्षे वयोगटातले असल्याची माहिती आहे.

या चौघांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT