Aryan Shahrukh Khan sakal
मुंबई

Mumbai : आर्यन खान जामिन ; एनसीबीने केला विरोध

विशेष एनडीपीएस न्यायालयात यावर आज सुनावणी झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनाला आज एनसीबीच्या वतीने विरोध करण्यात आला. आर्यनसह पाचजणांनी जामिनासाठी अर्ज केला असून बुधवारी (13) यावर सुनावणी होणार आहे.

आर्यन सह अरबाज खान, मुनमून धनेचा, नुपूर सतेजा आणि मोहक जैस्वाल यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयात यावर आज सुनावणी झाली. आर्यनच्या वतीने एड अमित देसाई यांनी बाजू मांडली तर अमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाच्या वतीने एड ए एम चिमलकर आणि एड अद्वैत सेठना यांनी बाजू मांडली. जामीन अर्जावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणखी आठवडाभराचा अवधी द्यावा, सध्या तपास महत्त्वाचा टप्प्यावर आहे आणि तपास यंत्रणेने महत्त्वाचे पुरावे जमा केले आहेत. त्यामुळे आता जर आर्यनला जामीन मंजूर केला तर त्यामुळे तपास प्रभावित होऊ शकतो, असा युक्तिवाद चिमलकर यांनी केला.

या विरोधाला देसाई यांनी आक्षेप घेतला. आरोपीला जामीन दिला तरी तपास थांबणार नाही. एनसीबी तपास करणारच आहे. त्यामुळे आरोपीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आर्यनकडे ड्रग्ज सापडले नाही आणि त्याच्या विरोधात काही पुरावा देखील नाही. अटकेपासून आठवडाभर तो एनसीबीच्या ताब्यात आहे. दोन वेळा त्याचा जबाब नोंदविला आहे. मग आता तो कारागृहात कशाला हवा असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला.

जामिनावर तातडीने सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे एड सेठना यांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणात प्रत्येक आरोपीकडे मिळालेल्या ड्रग्ज चे प्रमाण कमी अधिक आहे. त्यामुळे आर्यनच्या जामिनावर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, अशी मागणी देसाई यांनी केली. विशेष न्या व्ही व्ही पाटील यांनी बुधवारी यावर सुनावणी निश्चित केली असून एनसीबीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. एनसीबीने आर्यनवर एनडीपीएस कायद्याअंतर्गत कलम 8 (क), 20(ब), 27, 28,29, 33 नुसार अमलीपदार्थ बाळगणे,. सेवन करणे आणि विकणे असे आरोप लावले आहेत. आतापर्यंत वीसजणांवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी केरळमच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT