6.50 कोटीं Sakal
मुंबई

Mumbai: महारेराकडून जप्त मालमत्तेचा लिलाव

33 प्रकरणातील 6.50 कोटींच्या वसुलीसाठी होणार लिलाव,घर खरेदीदारांना संबंधित विकासकांनी( बिल्डरने) वेळेवर ताबा न देणे , प्रकल्प अर्धवट सोडणे, निर्धारित गुणवत्ता न राखणे, इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी महारेराकडे येतात.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महारेराने रायगड जिल्ह्यातील ३८ प्रकल्पांतील दिरंगाई आणि तत्सम बाबींसाठी ९९ प्रकरणात २२.२ कोटींचे व जारी केलेले आहेत. यात पनवेल तहसील कार्यालय क्षेत्रातील एन.के.भूपेशबाबू या विकासकाकडून 33 वॉरंटसपोटी ६.५० कोटी वसूल होणे अपेक्षित आहे .

त्यासाठी पनवेल तहसील कार्यालयाने या विकासकाच्या मौजे मोर्बे येथील 93/2/9, 93/3, 93/5, 93/6, 93/9 , 93/11 या सर्वे क्रमांकांच्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत.

आता या मालमत्तांचा लिलाव दिनांक 20 एप्रिल रोजी मौजे मोर्बेच्या ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. इच्छुकांना दि. १९ एप्रिल पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ते ३ या काळात या मालमत्ता पाहण्याची सोय पनवेल तहसील कार्यालयाने केलेली आहे.

महारेराने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून जारी केलेल्या वारंटसचा आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे. वेळोवेळी जारी केलेल्या वारंटसची वसुली व्हावी यासाठी राज्यातील १३ जिल्हाधिकारी कार्यालयांना वेळोवेळी स्मरणपत्रेही पाठविली आहेत. त्याबाबत संबंधित उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.

त्यामुळे यापूर्वी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील ११८ वारंटसपोटी १००.५७ कोटी वसूल झालेले आहेत. यात रायगड जिल्ह्यातील २ प्रकरणांतील ८१ लाख रूपयांचा समावेश आहे.

घर खरेदीदारांना संबंधित विकासकांनी( बिल्डरने) वेळेवर ताबा न देणे , प्रकल्प अर्धवट सोडणे, निर्धारित गुणवत्ता न राखणे, इत्यादी स्वरूपाच्या तक्रारी महारेराकडे येतात.

घर खरेदीदारांच्या या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रितसर सुनावणी होऊन प्रकरणपरत्वे व्याज/नुकसान भरपाई/परतावा इत्यादी विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना दिले जातात. दिलेल्या कालावधीत विकासकांनी रक्कम दिली नाहीतर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते. म्हणून महारेराकडून असे वारंटस संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT