मारोती धर्माधिकारी भावुक sakal
मुंबई

Mumbai : ना लाठी ना काठी तरी बाबासाहेबांनी समाजाला घडवलं

१०१ वर्षाचे धर्माधिकारी डॉ.बाबासाहेबांची आठवण सांगताना झाले भाऊक

प्रशांत कांबळे :सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अस्पृश्य म्हणून हिणवल्या गेलेल्या दिनदलीत बहुजनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं, त्यांना समान न्याय हक्क मिळवून दिले, देशातल्या प्रत्येकावर बाबासाहेबांचे उपकार आहे. ना लाठी ना काठी वापरली तरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बहुजनांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. त्यामुळे या देहावर त्यांचेच उपकार आहे. जो पर्यंत जिवंत असेल तो पर्यंत चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येत राहील असे सांगतांना लातूर जिल्ह्याच्या जळकुट तालुक्यातील मंगरूळ गावचे मुळ रहिवासी मारोती धर्माधिकारी भावुक झाले.

घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर पोहचले आहे. उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेशातूनही लोक स्वतःची तिकीट काढून आल्याचे गर्वाने सांगतात, ६ डिसेंबर रोजी असलेल्या महापरिनिर्वानाला अभिवादन वाहिन्यासाठी दोन दिवसांपूर्वीच अनुयायांनी चैत्यभूमी आणि शिवाजी मैदानात गर्दी केली आहे. वयोवृद्ध, लहान मुले, युवकांची चैत्यभूमीवर गर्दी दिसून येत आहे. चैत्यभूमीच्या शेजारी नियमित असलेले स्टॉल अनुयायांनी गजबजून गेले आहे.

अभिवादनासाठी दोन किलोमीटरची रांग

चैत्यभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन वाहीन्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातील अनुयायांनी गर्दी केली आहे. ६ डिसेंबर रोजी देशभरातील अनुयायांना अभिवादन वाहता यावे यासाठी मुंबई उपनगरातील अनुयायांनी चैत्यभूमीवर येऊन रविवार पासूनच अभिवादन वाहायला सुरुवात केली आहे. सकाळी फार गर्दी नव्हती मात्र, दुपार नंतर अचानक अनुयायांनी गर्दी वाढल्याने सायंकाळी सुमारे दोन किलोमीटरची अनुयायांची रांग दिसून आली.

कचऱ्यावर बसून खाणाऱ्या जातीला बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याचे अधिकार मिळवून दिले. त्यांच्यामुळेच आज आम्ही आहोत. बाबासाहेबांच्या आठवणी अजूनही मनात आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्यभूमीवर येतो

- मारोती धर्माधिकारी, लातूर,

१९९५ पासून बाबासाहेबांचा स्पर्श झालेल्या प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो. नागपूर, बौद्ध गया, चैत्यभूमी इथे गेलो आहे. अस्पृश्यांना नाहीतर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना बाबासाहेबांनी समान न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे दरवर्षी चैत्यभूमीवर येतो, उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून हजारो आंबेडकरी अनुयायी आले आहे. २ तारखेला लखनऊ येथून निघालो होतो. ४ तारखेला मुंबईत पोहचलो, तेही स्वतःच्या पैशाने तिकीट काढून आलो. तिकीट नसली तरी रेल्वे प्रशासन त्रास देते.

- रामपाल, लखनऊ, उत्तर प्रदेश

इथे येण्याची पहिलीच वेळ आहे. चैत्यभूमीवर गावातील लोक दरवर्षी येतात त्यामुळे यावेळी सहकुटुंब आम्ही चैत्यभूमीवर आलो. बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पुन्हा गावी जाऊन बाबासाहेबांना नतमस्तक होणार आहे. पण, इथे येऊन बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुयायांना पाहून भरून आले. त्यामुळे आता दरवर्षी येईल

- नितीन काणेकर, भंडारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates : "खरी लाचारी आज बघितली" उपमुख्यमंत्री शिंदेंनी जय गुजरात दिलेल्या घोषणेवर मनसे नेत्याची टीका

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

ती खूपच बारीक, काळी-सावळी... प्रियांका चोप्राला पहिल्यांदा पाहिल्यावर थक्क झालेली मराठी अभिनेत्री; म्हणाली- ती हिरोईन बनायला आलेली...

FASTag Annual Pass: FASTag वार्षिक पास घ्यायचा विचार करताय? मग घेण्यापूर्वी 'हे' 11 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची सविस्तर उत्तरं जरूर वाचा!

SCROLL FOR NEXT