Pravin-Darekar sakal media
मुंबई

मुंबै बँकेची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात १ हजार कोटीचा दावा - प्रविण दरेकर

सिद्धेश डुकरे

मुंबई : मुंबै जिल्हा मध्यवर्ती बॅंक (Mumbai bank) ही राज्यातील प्रगत आणि उत्तम बॅंक आहे. कारण मुंबै बॅंक आम्ही बाराशे कोटीच्या टप्प्यावरून दहा हजार कोटीवर मेहनतीने आणली. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. या लौकिकास काळीमा फासण्याचे काम दुदैर्वाने काही जणांकडून झाले आहे. त्यामुळे बॅंकेच्या संदर्भात कोणीही उठसूट वाटेल ते स्टेटमेंट (people statement) देईल हे अयोग्य असल्यामुळे बँकेने कालच मुंबई उच्च न्यायालयात (mumbai high court) १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर (pravin darekar) यांनी आज दिली.

प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेला इथपर्यंत आणण्यात अनेक माजी अध्यक्ष, संचालक आंदीचे योगदान आहे. मुंबईच्या सहकाराचे हे वैभव आहे. पण बॅंकेला काळिमा फासण्याचे काम सर्व टप्प्यावर होत आहे. आमची राजकीय बदनामी करा, वैयक्तिक बदनामी करा परंतु एका आर्थिक संस्थेची बदनामी झाल्याचा परिणाम त्यांचे ग्राहक, डिपॉझिटर्स यांच्यावर होतो.

या बँकेवर हजारो लोकांचे पोट अवलंबून असते. एखाद्या बातमीने किंवा एखाद्या स्टेटमेंटने बँक अडचणीत आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्ही मुंबई बँकेच्या बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात सूट नंबर २१९०९ आणि सूट नंबर २१९३५ या नोंदणी क्रमांकप्रमाणे दावा दाखल केला आहे. बॅंकेची नाहक बदनामी करणा-यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आम्ही न्यायालयात केल्याची माहिती दरेकर यांनी यावेळी दिली. आम्ही सव्वा रुपया वगैरेचा नाही तर १ हजार कोटीचा दावा दाखल केल्याचा मार्मिक टोलाही दरेकर यांनी यावेळी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT