doctor breaks down in tears on corona situation  
मुंबई

"याआधी असं पाहिलं नव्हतं"; महिला डॉक्टरच्या भावनांचा फुटला बांध

रुग्णांची अवस्था पाहून डॉक्टर भावूक

शर्वरी जोशी

मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केला आहे. अनेक राज्यांमधील जनता या विषाणूसोबत लढा देत आहे. यात महाराष्ट्राचीही परिस्थिती फारशी वेगळी नाही. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. परिणामी, अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर व बेडची कमतरता जाणवू लागली आहे. विशेष म्हणजे डॉक्टर, नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी सातत्याने सेवा बजावत रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, दररोज रुग्णांचे होणारे हाल पाहून डॉक्टरही भावनिकदृष्ट्या हतबल झाले असून त्यांच्या भावनांचा बांध फुटू लागला आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका महिला डॉक्टरचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

सध्या सोशल मीडियावर मुंबईतील infectious diseases specialist डॉ. तृप्ती गिलाडा यांचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कोरोनामुळे रुग्णांवर ओढावलेलं संकट, त्यांची बिकट परिस्थिती आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीविषयी भाष्य केलं आहे.

"दिवसेंदिवस सगळ्या राज्य व शहरांमधील स्थिती गंभीर होत चालली आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये आयसीयूमध्ये जागा नाही. यापूर्वी अशी स्थिती आम्ही कधीच कोणी पाहिली नव्हती. आम्ही हतबल आहोत. जर गेल्या वर्षभरापासून तुम्हाला कोरोनाची लागण झाली नसेल आणि तुम्ही सुपरहिरो आहात किंवा तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गैरसमजामध्ये आहात. आम्ही लोक ३५ वर्षांच्या तरुणांना पाहतोय जे व्हेंटीलेटरवर आहेत आणि मृत्युशी झगडत आहेत, असं तृप्ती यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणतात, "खरंच अशी परिस्थिती आम्ही कधीच पाहिली नव्हती. एकाच वेळी इतक्या व्यक्तींना हाताळावं लागेल असं वाटलं नव्हतं. आम्ही लोकांना त्यांच्या घरात राहून ऑक्सिजनची सेवा पुरवण्याचं काम करत आहोत. आताच्या परिस्थितीमध्ये आमच्या डॉक्टरांचादेखील भावनिक बांध फुटू लागला आहे. त्यामुळे या काळात कृपया स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कोरोना तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहे. त्यामुळे घरातून बाहेर निघतांना मास्क वापरा. ताप आला तर घाबरुन जाऊ नका लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा."

दरम्यान, गेल्या काही काळापासून कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींना त्यांचे प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meena river flood impact: मीना नदीत जलपर्णी व कचऱ्यामुळे प्रवाह अडला; पुराचे पाणी शेतात घुसून सुपीक माती वाहून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

Pune Metro Delay: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुलकावणी; पीएमआरडीएच्या चौथ्या घोषणेलाही फोल

Smart Meter Policy: ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिय्या आंदोलनानंतर महावितरणचा शब्द

Apple Orchard Protection : समुद्रातील जुन्या जाळ्या अन् बांबूची कमाल! सफरचंदाच्या बागेसाठी शेतकऱ्याचा अजब जुगाड; फक्त 35 हजारांत माकडं अन् पक्ष्यांपासून मिळवलं 'सुरक्षा कवच'

मोठी बातमी! स्व. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

SCROLL FOR NEXT