bdd chawl sakal media
मुंबई

मुंबई : ‘बीडीडी’तील वादग्रस्त घरे संचालकांच्या नावे होणार

वारसांकडून घर हस्तांतरणामध्ये मतभेद

तेजस वाघमारे

मुंबई : बीडीडी चाळीतील (BDD Chaul) मूळ भाडेकरूचे निधन झाल्यानंतर त्याच्या पश्चात वारसदारांच्या नावे घर हस्तांतरण करण्याबाबत एकमत होत नसल्याचे दिसत आहे. संबंधित घराची पात्रता निश्चित करण्यास अडचण येत असल्याने अखेर गृह निर्माण विभागाने (housing department) अशा प्रकरणांमध्ये वादग्रस्त घर संचालकांच्या नावे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वारसाच्या वादात घर हस्तांतरण करण्यास विलंब करणाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे.

राज्य सरकारने (mva Government) बीडीडी चाळ पुनर्विकासातील (redevelopment) लाभार्थींची पात्रता निश्चिती करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत; मात्र चाळीतील मूळ भाडेकरूचे निधन झाल्यानंतर त्याच्या वारसदारांमध्ये (nominee) घर कोणाच्या नावे करावे याबाबत एकमत होत नाही.

अशा प्रकरणांमध्ये बीडीडी चाळी संचालकांकडे काही सुनावण्या झाल्या. सुनावणीसाठी संबंधित वारसदार उपस्थित राहत नसल्याने वारसा हक्काने गाळा हस्तांतरणाची प्रक्रिया प्रलंबित राहत आहे. त्याबाबत सरकारने पात्रता निश्चित करण्याबाबत सूचना द्याव्यात, असा प्रस्ताव म्हाडाने गृहनिर्माण विभागाला दिला होता. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने अशा प्रकरणांमध्ये सद्यस्थितीत घरामध्ये वास्तव्य असलेल्या भाडेकरूंचे संक्रमण शिबिरात तात्पुरते स्थलांतर करावे, घर बीडीडी चाळी संचालकाच्या नावे ठेवण्यात यावे आदी सूचना गृहनिर्माण विभागाने दिल्या आहेत. वारसांकडून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे उपलब्ध करून दिल्यानंतर घर वारसांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT