mumbai best bus sakal
मुंबई

Best Bus : बेस्टवर सहा हजार कोटींचे कर्ज; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ७०० कोटींची आहेत देणी

बेस्ट उपक्रमावर सध्या सहा हजार कोटींचे कर्ज आहे. तर डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत ७१२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ७०० कोटींची देणी आहेत. बेस्टवर कर्जाचा डोंगर आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बेस्ट उपक्रमावर सध्या सहा हजार कोटींचे कर्ज आहे. तर डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत ७१२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ७०० कोटींची देणी आहेत. बेस्टवर कर्जाचा डोंगर आहे.

ना नफा ना तोटा या तत्वावर बेस्ट उपक्रमाचा उपक्रम चालतो. तरीही बेस्ट उपक्रमाच्या बस प्रवाशांना व वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बेस्ट उपक्रम विविध योजना राबवत आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देणारी बेस्ट आर्थिक संकटात सापडली आहे.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महापालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे करत आतापर्यंत चार हजार कोटींची मदत केली आहे. तर सन २०२३ - २४ या आर्थिक वर्षात ८०० कोटींची मदत करणार आहे. तरीही बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडली आहे.

सेवानिवृत्त कर्मचारी, टाटा पॉवर आदींची देणी आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमावर सद्यस्थितीत सहा हजार कोटींचे कर्ज असल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. जून महिन्यात ५७८ सेवावृत्त होणार आहेत.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त नंतर सेवावृत्तीचे लाभ मिळतात. मात्र डिसेंबर २०२२ ते मे २०२३ पर्यंत ७१२ अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांना ७०० कोटींची देणी देणे आहे. सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची देणी लवकरात लवकर देण्यात येतील.

- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी संख्या

विद्युत विभाग - ५,१४३

परिवहन अभियांत्रिकी विभाग - ४,३७२

वाहतूक विभाग - १७,८९३

सामान्य प्रशासन - १,६०५

एकूण संख्या - २९,०१३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

Naigaon Crime : बापाचा मृतदेह दारातच सोडून नराधम मुलगा पळाला; मात्र, पोलिसांनी मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT