mumbai best bus worker strike mumbaikar preferred metro Sakal
मुंबई

Mumbai Best Worker Strike : बेस्ट सेवा कोलमडली; मेट्रोला मुंबईकरांची पसंती

मेट्रो वन आणि मेट्रो २ अ व ७ या मार्गिकांवरदेखील प्रवाशांचा मेट्रोला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील पहिल्या मेट्रोच्या जाळ्याला मुंबईकरांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतो आहे. मेट्रो वन आणि मेट्रो २ अ व ७ या मार्गिकांवरदेखील प्रवाशांचा मेट्रोला प्रतिसाद वाढतो आहे. बेस्ट संपकाळात सर्वाधिक मुंबईकरांनी मेट्रोने प्रवास करण्यास पसंती दिल्याचे आकडेवारी सांगते. अशातच गोरेगाव नेस्को सेंटर येथे सुरु असलेल्या ज्वेलरी प्रदर्शनामुळेही मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ दिसून आल्याचे एमएमएमओसीएलने सांगितले.

नेसको सेंटर गोरेगाव येथे सुरु असलेल्या ज्वेलरी प्रदर्शनामुळे ६००० अतिरिक्त प्रवाश्यांची मट्रो २ अ आणि ७ ने प्रवास करणे पसंत केले. यामुळे पहिल्यांदाच गोरेगाव पूर्व या स्थानकाच्या १०००० प्रवासी संख्येचा टप्पा पार केला.

तसेच, बेस्ट कर्मचारी संपामुळे मालाड येथे प्रवास करणाऱ्यांची संख्या ११००० इतकी नोंदविली गेली. सहा स्थानकांची एकूण १०००० ते ११००० प्रवासी प्रतिदिनचा टप्पा पार केला. गुंदवलीला सर्वाधिक २६,०८४ आणि अंधेरी पश्चिम २५,२५७ इतकी प्रवासी संख्या नोंदविली गेली.

स्थानकनिहाय संख्या

  • लोअर ओशिवरा - १०,०७८

  • गोरेगाव पूर्व - १०,१५३

  • कांदिवली पूर्व - १०,१७६

  • दहिसर पूर्व - १०,२१४

  • डहाणूकरवाडी - १०,३१३

  • मालाड पश्चिम - ११,४४०

तिकीटाची माध्यम

  • पेपर क्यूआर - ६२%

  • एनसीएमसी - ३४%

  • मोबाईल ऍप - ४%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT