girl crime 
मुंबई

Mumbai Crime: 3 काका रिक्षामधून आले अन्...; आई रागवत असल्याने शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव

Mumbai Crime Shocking News: मुलीला आई अभ्यास न केल्यामुळे रागावायची. यामुळे मुलीने स्वत:चे अपहरण झाल्याचा आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव केला आहे. सदर घटनेचा उलगडा होताच एकच खळबळ उडाली आहे.

कार्तिक पुजारी

Mumbai Crime News: भांडुपमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळकरी मुलीने स्वत:वर लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव केला आहे. मुलीला आई अभ्यास न केल्यामुळे रागावायची. यामुळे मुलीने स्वत:चे अपहरण झाल्याचा आणि लैंगिक अत्याचार झाल्याचा बनाव केला आहे. सदर घटनेचा उलगडा होताच एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या कुटुंबासोबत भांडुप येथे राहते. शनिवारी मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. पण, शाळा सुटण्याची वेळी झाली तरी ती घरी परत आली नाही. त्यामुळे कुटुंबियांना तिची चिंता वाटू लागली. कुटुंबियांनी मुलीचा शोधाशोध सुरु केला. पण, ती कुठे सापडली नाही. संध्याकाळी उशिरा मुलगी आपोआप घरी परतली.

घरी आलेल्या मुलीला कुटुंबियांनी उशिरा येण्याचे कारण विचारले. यावेळी मुलीने धक्कादायक माहिती दिली. मुलीने सांगितलं की, ती शाळेत जात असताना तिघे जण रिक्षामधून आले. त्यांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधला अन् तिला ठाण्याच्या दिशेने नेले. याठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.

सदर घटना धक्कादायक होती, त्यामुळे कुटुंबियांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. भांडुप पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. त्यांनी आधी मुलीची चौकशी केली. पण, मुलीने सांगितलेला घटनाक्रम आणि पुरावे यामध्ये तफावत आढळून आली. मुलगी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी सांगत होती. त्यानंतर पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतलं आणि तिला खरा प्रकार विचारला.

घाबरलेल्या मुलीने शेवटी खरं काय झालं ते सांगितलं. आई सतत अभ्यासावरून रागवते. त्यामुळे आपण अपहरण झाल्याचा आणि तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचा बनाव रचला असं सांगितलं. मुलीचे हे बोलणं ऐकून पोलीस देखील आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान,सध्या मुंबईसह राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पण, सदरच्या घटना प्रकारामुळे पोलीस देखील आवाक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT