mumbai taxi sakal
मुंबई

Taxi Driver Crime : पाच महिन्यात ७५९ टॅक्सी चालकांवर भरारी पथकाची कारवाई

प्रादेशिक परिवहन अधिकारी ताडदेव कार्यालयाच्या वतीने मध्य मुंबईत मोटार वाहन कायद्यांतर्गत नियम मोडणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

प्रादेशिक परिवहन अधिकारी ताडदेव कार्यालयाच्या वतीने मध्य मुंबईत मोटार वाहन कायद्यांतर्गत नियम मोडणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

मुंबई - प्रादेशिक परिवहन अधिकारी ताडदेव कार्यालयाच्या वतीने मध्य मुंबईत मोटार वाहन कायद्यांतर्गत नियम मोडणाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यात सुमारे ७५९ टॅक्सी चालकांवर विविध गुन्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन लाख ४० हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे यापैकी ७१५ गुन्हे भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांचे असल्याची माहिती मध्य मुंबईचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.

मुंबईत टॅक्सी चालकांकडून दैनंदिन वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असून, यामध्ये भाडे नाकारण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पाच महिन्यात मध्य मुंबई आरटीओ कार्यालयातील भरारी पथकाने अशा टॅक्सी चालकांच्या विरुद्ध नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली असून, ज्यामध्ये ७१५ गुन्हे भाडे नाकारणे, जादा भाडे वसुली ३५ तर प्रवाशांना वाईट वागणूक देण्याच्या ९ घटना घडल्या असून, अशा एकूण ७५९ तक्रारी भरारी पथकाकडे दाखल झाल्या असून, त्यापैकी १७० तक्रारी ऑन स्पॉट सोडवण्यात आल्या आहे. तर ५८९ तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती कळसकर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Banerjee Controversy : नगरसेविकेच्या कार्यालयात कंडोमचा खच, मसाज मशीन्स अन् गुप्त मेकअप रूम; आतील दृश्य पाहून सर्वजण हादरले

Kartik Joshi : कार्तिक जोशीची कारगिल ते कन्याकुमारी ऐतिहासिक धाव, महाराष्ट्रात आगमन

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरूवारी बंद राहणार

Vaibhav Sooryavanshi ला मॅच सोडून "घरी जा" असं का म्हटलं? इंडिया अ च्या सामन्यात अचानक का वाढला तणाव; जाणून घ्या काय घडलं

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT