Mumbai Ganeshotsav sakal
मुंबई

Mumbai Ganeshotsav : मोठ्या मंगलमू्र्तींचे गणेशमंडपात आगमन

गणेशोत्सावासाठी लगबग सुरु झाली आहे. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन सुरु झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गणेशोत्सावासाठी लगबग सुरु झाली आहे. सार्वजनिक मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन सुरु झाले आहे. गेल्या आठवड्यात काही गणपतींचे आगमन झाल्यानंतर शनिवारी २ सप्टेंबरला परळचा महाराजा, कुलाबाचा राजा, बिलीमोराचा चिंतामणी, मुंबईचा युवराज, कोल्हापूरचा सम्राट, मुंबईचा पेशवा आदी गणपतींचे वाजत गाजत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात गणेशाचे आगमन झाले. उद्याही मोठ्या गणपतींचे आगमन होणार आहे.

रविवारी ३ सप्टेंबर रोजी खेतवाडीचा विघ्नहर्ता, मुंबा देवीचा सम्राट, जोगेश्वरीचा राजा, गिरणगावचा राजा, फोर्टचा राजा, ताडदेवचा राजा, लव्हलेनचा राजा, मलबार हिलचा राजा, आदी मंडळांच्या मंडपात आगमन होणार आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृतीसाठी अनेक मंडळांनी सामाजिक उपक्रम आखले आहेत. मंडळे यासाठी कामाला लागली आहेत. १९ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र त्या आधीच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होते. गेल्या रविवारपासूनच गणपतीच्या आगमनाला सुरुवात झाली आहे.

शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईतील मंडळांनी गणपती बाप्पाला मंडपात वाजत गाजत आणले. रविवारीही ३० हून अधिक गणपती मंडळांच्या मंडपात गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

गणेशोत्वाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकाही सज्ज झाली आहे. गणपती आगमन ते विसर्जनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, चौपाट्यांवरील सुविधा आदींचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठं अपडेट! अहवाल कधी येणार? पगारवाढ कधी? संसदेत सरकारने दिली माहिती

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेनंतर हिंदूत्ववादी संघटनांकडून मंचाचे शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजपवर निशाणा- हा तर दलितांचा अपमान

Ghatkopar Landslide Case: मुंबईतील मुक्काम ठरला अखेरचा! घाटकोपरमध्ये दरड कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत

Ghatkopar Landslide: भाच्यांना वाचवले, पण मुलाला गमावले; घाटकोपर दुर्घटनेत १६ वर्षीय मोहम्मदचा मृत्यू

Child Cancer: मुलांभोवती कर्करोगाचा विळखा घट्ट! चौदा वर्षांपर्यंतच्या मुलांना मोठा धोका; अन्य ‘सार्क’ देशांतील आजार वाढला

SCROLL FOR NEXT