Ujjwal Nikam esakal
मुंबई

Ujjwal Nikam: PM मोदी अन् फडणवीसांमुळे डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो, उज्ज्वल निकमांचा खुलासा

Ujjwal Nikam: प्रसिद्ध वकील आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी राजकारण हे त्यांच्यासाठी एक नवीन आव्हान असल्याचे सांगितले.

Sandip Kapde

मुंबई: ज्येष्ठ वकील आणि मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या सर्व 29 प्रलंबित खटल्यांचा राजीनामा दिला आहे. या खटल्यांमध्ये निकम हे विशेष सरकारी वकील होते. ही प्रकरणे त्यांना महाराष्ट्र सरकारने सोपवली होती. ज्यात मुंबईतील आठ हायप्रोफाईल केसेसचा समावेश होता. या प्रकरणांमध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचाही समावेश होता. (Ujjwal Nikam News In Marathi)

यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधला. निकम यांना भाजपने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

"मी कोणत्याही फायद्यासाठी राजकारणात नाही. मी संघटित गुन्हेगारीविरुद्ध लढलो आहे, मी कधीही आरोपीच्या बाजूने लढलो नाही. 26/11 केसमध्ये मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एनएसए अजित डोवाल यांच्या मदतीने कोर्टात डेव्हिड हेडलीचे स्टेटमेंट घेऊ शकलो... त्यामुळे या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे आम्ही सिद्ध करू शकलो...", असे उज्ज्वल निकम म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चमकदार कार्याने देशाची प्रतिष्ठा जगात उंचावल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केला. राजकारण हे नवे आव्हान असून मी सर्वसामान्यांचा विश्वास जिंकणार असल्याचे ते म्हणाले.

सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास दृढ व्हावा यासाठी संसदेत कायदा बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे. तसेच भाजपचा जाहीरनामा अमलात आणण्यासाठी काम करणार असल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT