rape case  File photo
मुंबई

मुंबईत भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

त्याने कार्यालयाचे शटर बंद केलं. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारलं.

राजू परुळेकर, सुरज सावंत

मुंबई: मुंबईतील भाजप महिला नगरसेविका (bjp women corporator) अंजली खेडकर (anjali khedkar) यांच्या संपर्क कार्यालयातच महिलेचा विनयभंग (molestation) करुन बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. देशाच्या स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे. तक्रार न करण्यासाठी भाजप नगरसेविकेने दबाव टाकल्याचा महिलेचा दावा आहे. दरम्यान बोरीवली (borivali) पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

पीडित महिला बोरिवली येथेच रहायला असून तिला समाजसेवेची आवड आहे. जुलै २०२० मध्ये पीडीत महिला आरोपी भाजपा कार्यकर्त्याच्या संपर्कात आली. अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांनी भेट घेतली. तेव्हा आरोपीशी तिथे ओळख झाली. आपल्याला समाजसेवेची आवड असल्याचे पीडीत महिलेने सांगितले. आरोपीशी ओळख झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. महिलेचा वॉर्डच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. त्यातून त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती मिळत होती.

१५ ऑगस्टला काय घडलं?

आरोपीने सदर महिलेला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास भेटण्यासाठी कार्यालयात बोलावले. त्याने कार्यालयाचे शटर बंद केलं. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, तसेच अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT