गणेशमुर्ती  sakal
मुंबई

Mumbai : पीओपी गणेशमुर्ती बंदीला भाजपचा विरोध

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, या उद्योगात रोजगार निर्माण होतात. संपूर्ण जगभरामध्ये महाराष्ट्रातला निर्माण केलेल्या या मूर्तीची उलाढाल सुमारे 80 हजार कोटीपर्यंत होते. पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा निर्णयाला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोध केला आहे.

लालबाग-परळ गणेशमूर्तीकार संघातर्फे आज परेल येथे महाराष्ट्रातील मुर्तीकारांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आशिष शेलार बोलत होते. कोटींची उलाढाल असलेला आणि मराठी तरुणांना रोजगार देणारा गणेशमूर्ती कारखाने हा उद्योग बंद करुन मराठी माणसाचा रोजगार बुडवू नका. यावर्षी ही पीओपीच्या गणेशमूर्तींना परवानगी मिळायलाच हवी, मुंबई महापालिकेने घातलेली बंदी आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली आहे.

मुर्तीकार ही एक मोठी इंडस्ट्री आहे, जगभरामध्ये महाराष्ट्रातला निर्माण केलेल्या या मुर्त्याच्या उलाढाल 70 हजार 80 हजार कोटीपर्यंत होते. एवढी मोठी इंडस्ट्री बंद करण्याचा प्रयत्न कोण करीत असेल तर आमचा विरोध आहे. पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालण्याचा प्रयत्न होत असेल तर तो महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचा नाही, असेही ते म्हणाले. शास्त्रज्ञांनी पीओपीच्या मुर्ती शास्त्रीय दृष्ट्या विरघळू शकतात, पर्यावरण घातक न ठरता सुद्धा विसर्जन होऊ शकते, या गोष्टी समोर आणल्या आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने सरकारने विचार करावा, असेही ते म्हणाले.

मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढले आहे की, चार फुटाच्या खालील मुर्ती ह्या शाडू मातीच्याच असाव्यात, हे आम्हाला अमान्य असून या संदर्भामध्ये पालिका आयुक्त उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी माझे बोलणे झाले आहे.न्यायालयीन काही आदेश असले तरी या पद्धतीने निर्णय होणे अपेक्षित आहे. पण हा मराठी माणसाचा रोजगार कुठे बंद होता कामा नये, अशी आमची भूमिका आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु का केले नाही?

मुंबई महापालिका गेली पंचवीस वर्षे मुंबईतील 3,500 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज समुद्रात कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडते आहे. मुंबई महापालिकेला फक्त गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते हे बोलण्याचा अधिकार आहे का? 80 हजार कोटींच्या ठेवी असताना का सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले नाहीत? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Women Cricketers Salary: नववर्षाआधी ‘BCCI’कडून महिला खेळाडूंना मोठी भेट; वेतनात केली दुप्पट वाढ

BJP Candidate List : भाजप उमेदवारांच्या यादीला शुक्रवारचा मुहूर्त; शिवसेनेसोबत जागावाटप अजूनही अनिश्चित!

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

SCROLL FOR NEXT