Rahul Deshpande Tiger Shroff BJP Sakal
मुंबई

Mumbai : टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेंची मैफिल थांबवली; भाजपाच्या कार्यक्रमातला प्रकार

मी पुढे गाणार नाही, असं राहुल देशपांडेंनी सांगूनही त्यांचं गाणं थांबवण्यात आलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईमध्ये भाजपाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. या कार्यक्रमातला एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी हा आरोप केला आहे.

मुंबईतल्या वरळीमध्ये मराठी सन्मानाचा आपला मराठमोठा दीपोत्सव हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही मैफिल सुरू असतानाच तिथे बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आला. त्यामुळे ही मैफिल थांबवण्यात आली. त्यानंतर टायगर श्रॉफचा सत्कार स्टेजवर करण्यात आला. हा राहुल देशपांडे यांचा अपमान असल्याचं सचिन अहीर यांनी म्हटलं आहे.

नक्की झालं काय?

सचिन अहीर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राहुल देशपांडे गात आहेत. याचवेळी सूत्रसंचालक पाच मिनिटांच्या ब्रेकची घोषणा करतात. त्यावर राहुल देशपांडे सांगतात की, आत्ता जर ब्रेक घेतला तर मी पुढे गाणं सादर करणार नाही. त्यानंतर आयोजकांसोबत चर्चा होते. आणि आपण २० मिनिटं गाणं सादर करतो, त्यानंतर तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, असं राहुल देशपांडेंनी सांगितलं. पण असं होऊनही स्टेजवर टायगर श्रॉफचा सत्कार केला जातो. यावरुन सचिन अहीर यांनी ट्वीट करत आपला आक्षेप नोंदवला आहे. हाच का मराठी कलाकारांचा सन्मान? असा सवाल अहीर यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT