मुंबई

Mumbai Dry Run: बीकेसी लसीकरण केंद्र ड्राय रनसाठी सज्ज

पूजा विचारे

मुंबईः  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उद्या शुक्रवार 8 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 30 जिल्हे आणि 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहिम राबविण्यात येणार आहे. यानुसार मुंबई महापालिकेद्वारे राजावाडी, कूपर रुग्णालयात तसेच बीकेसी येथील कोविड सेंटर अशा तीन ठिकाणी ड्राय रन घेण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. दरम्यान बीकेसी लसीकरण केंद्र आजच्या लसीकरणाच्या ड्राय रनसाठी सज्ज आहे. लसीकरणाच्या पूर्वीच्या ड्राय रनसाठी या ठिकणी पूर्ण तयारी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

कोव्हीन अँपमध्ये नोंदणी केलेल्या 25 लाभार्थी या ठिकणी लसीकरणच्या ड्राय रनमध्ये सहभागी होणार आहेत. या बीकेसी लसीकरण केंद्रात प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतर एकावेळी 15 व्हॅक्सिनेशन रूममध्ये 15 लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठीची रंगीत तालीम आज या ठिकाणी पाहायला मिळेल. 

या ठिकाणी दिवसाला अडीच हजारांच्या जवळपास लाभार्थ्यांना लस देण्याचं आव्हान असणार आहे. त्यासाठी मोठी वेटिंग रूम, 7 रजिस्ट्रेशन काउंटर, 15 व्हॅक्सिनेशन सेंटर, अब्जरेव्हेशन सेंटर, मोनिटरिंग रूम ( ज्या ठिकाणी लस दिल्यानंतर त्रास झाल्यास उपचार केला जाणार) अशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे.

व्यक्तीला लसीकरणानंतर त्रास झाल्यास तातडीने मोनिटरिंग रूममध्ये त्यावर उपचार केले जाणार सोबतच या ठिकाणी आयसीयूची सोय सुद्धा असणार आहे. एकूण 90 डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी या ठिकाणी या लसीकरणाच्या मोहिमेत काम करतील.

Mumbai BKC Vaccination Center ready for dry run here look photo

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT