Mumbai Black Magic sakal
मुंबई

Mumbai Black Magic : अमावस्येच्या रात्री कोंबड्याची सुटका, सुशिक्षितांच्या डोंबिवलीत ब्लॅक मॅजिकचा प्रकार

पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे हे रस्त्याने जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी त्या मंडळींना काय चालले आहे विचारताच मंडळींनी तेथून पळ काढला. कोंबड्याची साळुंखे यांनी सुटका केली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली शहर हे सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र या सुशिक्षित नगरीतील नागरिक विविध प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडत आहेत हेही तितकेच खरे आहे. सावरकर रोड येथे अमावस्येच्या रात्री भर रस्त्यात सावरकर रोडवर काही मंडळी ही पूजाविधी करत कोंबड्याचा बळी देण्याच्या विचारात होती.

पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे हे रस्त्याने जात असताना त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी त्या मंडळींना काय चालले आहे विचारताच मंडळींनी तेथून पळ काढला. कोंबड्या ची साळुंखे यांनी सुटका केली आहे. याआधी ही 50 करोडचा पैशांचा पाऊस पाडणे, पैशांसाठी डुरक्या घोणस पाळणे असे प्रकार डोंबिवलीत उघडकीस आले आहेत. यामुळे सुशिक्षितांच्या नगरीत चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डोंबिवली पूर्व येथील सावरकर रोडवर गुरुवारी अमावस्येच्या मध्यरात्री काही तीन-चार मंडळी पूजा विधी करत होती. पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे हे त्या रस्त्याने जात असताना त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आपली गाडी बाजूला उभी करत त्या मंडळींजवळ गेले. इथे काय सुरू आहे अशी विचारणा त्यांनी केली असता त्या मंडळींनी घटनास्थळावरून पळ काढला.

ओंकार यांनी तेथे पाहणी केली असता त्या ठिकाणी चाकू, लिंबू, निळ, गुलाल वैगरे वस्तू आढळून आल्या .तसेच एका कोंबड्याचे पाय बांधून तो तेथे ठेवला होता. दरम्यान ओंकार याने त्या कोंबड्याची सुखरूप सुटका करत त्याला खायला दाणे देत, पाणी पाजत त्याचा जीव वाचवला. या कोंबड्याला ठाणे येथील फ्रीडम फार्म मध्येसोडण्यात येईल असे संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी सांगितले. गुरुवारी रात्री पासून अमावस्या सुरु झाली आहे. हा प्रकार पाहता अंधश्रद्धेपोटी एका कोंबड्याचा बळी दिला जात असावा असे देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

England Test Captain: इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? ECBच्या एका निर्णयाने वाढवलं सस्पेन्स,नेमकं कोणाचं नाव चर्चेत?

SCROLL FOR NEXT