आंदोलन Sakal
मुंबई

Mumbai : डोंबिवलीकरांचा ब्लॅक आऊट म्हणजे विघ्न संतोषी लोकांचे आंदोलन

डोंबिवलीतील शिंदे गटाचा आरोप

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या डोंबिवलीकरांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज गुरुवारी राञी 8 वाजता शहरात अंधार करायचा निर्णय घेतला आहे. डोंबिवलीकरांची ही आक्रमक भूमिका शिंदे गटाला जिव्हारी लागली असून डोंबिवलीकरांचा ब्लॅक आऊट म्हणजे विघ्न संतोषी लोकांचे आंदोलन असल्याचा आरोप माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला. या दुर्दैवी लोकांना विकासाची कामे दिसत नसतील आणि चांगल्या सणाच्या दिवशी डोंबिवली ला बदनाम करण्याचे काम ही विघ्न संतोषी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो असा टोला त्यांनी आंदोलनकर्त्याना लगावला आहे.

डोंबिवलीतील रस्त्यांच्या बकाल अवस्थेचा निषेध करण्यासाठी डोंबिवलीकर आज (गुरुवारी) रात्री 8 वाजता घरात अंधार करून या समस्येविषयी प्रशासनाचा निषेध करणार आहेत. तसेच रस्त्यावर उतरून घंटानाद, थाळीनाद आंदोलन करणार आहेत. नागरिकांनी हे आंदोलन उभे केले असून अराजकीय स्वरूपाचे हे आंदोलन असल्याचे आंदोलनकर्ते सांगतात. अराजकीय या आंदोलनाला शिंदे गटाने राजकीय स्वरूप देऊ केले असल्याचे दिसते. डोंबिवलीकरांचे हे आंदोलन राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद शिंदे गटाच्या वतीने घेण्यात आली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, महेश पाटील, रमेश म्हात्रे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपेश म्हात्रे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमातून एक संदेश फिरत आहे. ज्यात काही लोक दिवाळीच्या आधी 20 ऑक्टोबरला रात्री 8 वाजता शहरात अंधार करीत, घंटानाद, थाळीनाद करणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवलीच्या विकासाची पावले उचलली गेली. दिवाळी अगोदर ऑन ड्युटी 24 तास रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे, कचरा उचलण्यी कामे सुरु आहेत. या कामांसाठी आयुक्तासह शहर अभियंते रस्त्यावर उतरले आहेत. ही कामे कोणाला दिसत नाही का ? असा सवाल करत ते म्हणाले, काही जे विघ्न संतोषी लोक आहेत त्यांच्यामुळे असे आंदोलन होतात. मी या दुर्दैवी लोकांना सांगेल की त्यांना विकासाची दृष्टी दिसत नसेल आणि चांगल्या सणाच्या दिवशी डोंबिवली ला बदनाम करण्याचे काम ही विघ्न संतोषी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामाची घोडदौड अशीच सुरु राहणार आहे असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT