'ब्लु टिक' sakal
मुंबई

Mumbai : ट्विटवरील 'ब्लु टिक' निघून गेली, नेत्यांचे पुढचे पाऊल काय ?

माझे ट्विटर व्हेरिफाईड होते. ब्लु टिक परत मिळविण्यासंदर्भात माझी टीम काम करते आहे. लवकरच पुन्हा अकाऊंट व्हेरिफाईड होईल - नितेश राणे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांपासून ते बॉलिवूडचे कलाकार आणि खेळाडू यांचे ट्विटवरील ब्लु टिक निघून गेले आहे. व्हेरिफाईड खात्यांसाठी विविध निकष ट्विटरने याआधी वापरले होते. पण आता ट्वीटरचे नवे प्रमुख एलन मस्क यांनी या ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार म्हणजेच पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केल्याने अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची ब्लू टिक निघाली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार,विरोधी पक्षनेते अजित पवार, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाजप आमदार नितेश राणे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लु टिक निघून गेले आहे.

तर अमिताभ बच्चन, सलमान खान या अभिनेत्यांच्या खात्यावरून ही व्हेरिफाईडचे निशाण काढून घेण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या खात्याचेही ब्ल्यू टिक निघून गेले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या ट्विटर हँडलला व्हेरिफाईड ब्लू टिक मिळाली होती. सकाळने त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर ही ब्लू टिक काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. माझ्या टिमशी संपर्क साधून ब्लू टिक परत मिळवण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

माझे ट्विटर व्हेरिफाईड होते. ब्लु टिक परत मिळविण्यासंदर्भात माझी टीम काम करते आहे. लवकरच पुन्हा अकाऊंट व्हेरिफाईड होईल.

- नितेश राणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare Health Update : सुषमा अंधारे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

इराणला अमेरिका देणार नुकसान भरपाई, १० कठोर अटी; ट्रम्पना मान्य, युद्धबंदीच्या चर्चेला तयार

'मी ढसाढसा रडतो...' स्वप्नील जोशी खरं सांगताना म्हणाला...'नाच ग घुमा पाहताना मला इतकं...'

Latest Marathi News Live Update: अमरावतीत फुलांचे दर कोसळले! १५० रुपयांचा गुलाब आता फक्त ५० रुपयांत

UP Treasure: पडक्या घराखाली सापडला खजिना’! लाखोंची नाणी उचलून लहान मुलांनी केला पोबारा, थरारक घटनेचा video viral

SCROLL FOR NEXT