Covid-19-vaccine 
मुंबई

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबद्दल मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: नागरिकांना घराजवळ कोविड लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची परवानगी मिळावी, यासाठी महानगर पालिकेने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर निवासी संकुलांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. रोज सरासरी ४० ते ४५ हजार कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या लाखापर्यंत वाढविण्याचे निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यासाठी महानगर पालिकेने नागरिकांना पूर्व नोंदणी न करता लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्याचबरोबर नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निवासी संकुला पर्यंत लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याचा महानगर पालिकेचा विचार आहे.त्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास संकुलांमध्ये लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याची परवानगी खासगी रुग्णालयांनाही देण्यात येणार आहे. मात्र त्यांच्याकडे फक्त लसीकरणाची सोय उपलब्ध आहे का हे पाहून चालणार नाही, तर त्या पथकासोबत वैद्यकीय सुविधा काय असेल? रुग्णालयात काय वैद्यकिय सुविधा असतील? याचाही विचार केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, असं काकाणी यांनी सांगितलं.

31 मे पर्यंत सर्व टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न

नव्या खासगी रुग्णांना लसीकरणाची परवानगी मिळावी म्हणून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. सध्या 100 ठिकाणी लसीकरण होत असून संख्या वाढल्यास लसीकरणाचा वेग वाढेल. लसीकरणाचा साठा योग्य प्रमाणात असून ४५ वर्षांवरील एकूण नागरिक साधरणपणे ४० लाखाच्या आसपास असतील. आतापर्यंत सुरु करण्यात आलेले सर्व टप्पे 31मे पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा विचार आहे, असेही काकाणी यांनी स्पष्ट केले.

दोन शिफ्टमध्ये लसीकरण

महानगर पालिका आता दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरु करणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 9 अशा दोन शिफ्टमध्ये लसीकरण केलं जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT