मुंबई

Mumbai Corona vaccination: लसीकरणासाठी पालिका थेट घरापर्यंत जाणार

समीर सुर्वे

मुंबई: कोविड लसीकरणाचा टक्का वाढला असला तरी अद्याप सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतलेली नाही. त्यामुळे आता महानगरपालिका या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना लसीकरणाचे आवाहन करणार आहे.

मुंबईत सध्या 12 केंद्रावर कोविड लसीकरण सुरु आहे. हा लसीकरणाचा पहिला टप्पा असून यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. 16 जानेवारी पासून कोविड लसीकरण सुरु झाले असून जानेवारी अखेरपर्यंत 7 हजार 923 कोविड योद्धांचे लसीकरण होणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत 6 हजार 351 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. सुरवातीला लसीकरणाला अत्यंत थंड प्रतिसाद होता. मात्र पालिकेने काही अटींमध्ये शिथीलता दिल्यावर लसीकरणाचा वेग वाढला आहे. पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.

लसीकरणाला प्रतिसाद वाढावा म्हणून आता महानगर पालिकेचे कर्मचारी थेट आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरी त्यांना लसीकरणासाठी आवाहन करणार आहे. कोविड काळात महानगर पालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रभागात वॉर रुम तयार केली होती. या वॉर रुमच्या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला विभाग ठरवून दिला जाणार आहे. त्या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे जाऊन हे कर्मचारी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार आहेत. सध्या लसीकरणानंतर काही त्रास असल्यास त्याबाबतही या वॉर रुम कर्मचाऱ्यांकडून माहिती जमा केली जात आहे, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai bombay Municipal Corporation Will go homes health workers appeal them be vaccinated

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT