Atul-Bhatkhalkar sakal media
मुंबई

Mumbai : पाकिस्तानमधील दोघी भारतात येणार, अतुल भातखळकर यांचे प्रयत्न सफल

त्यांना भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेला 'व्हिसा' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पाकिस्तानातील कराचीमध्ये असलेल्या आपल्या भाच्यांना भारतात आणण्यासाठी महिनोनमहिने प्रयत्न करणाऱ्या वयोवृद्ध मामाला आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला आहे. आता त्या दोघी लौकरच भारतात येतील.

त्यांना भारतात आणण्यासाठी आवश्यक असलेला 'व्हिसा' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेमराज सोनी असे त्या मामाचे नाव असून ते मालाड (पूर्व) येथे राहतात. त्यांच्या भाच्या गीता आणि रीटा सध्या काराचीमध्ये आहेत.

या दोघींना भारतात आणण्यासाठी त्यांचे मामा हेमराज सोनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. मात्र त्यांना त्यात यश आले नाही. अखेर त्यांनी आमदार अतुल भातखळकर यांची भेट घेतली. भातखळकर यांनी समस्या समजावून घेतली.

आवश्यक ती सर्व प्रशासकीय मदत त्यांनी सोनी यांना केली. त्यानंतर आता सोनी यांच्या भाच्या भारतात येण्यासाठी आवश्यक असलेला 'व्हिसा' मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल सोनी यांनी भातखळकर यांचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT