मुंबई

Mumbai: दारुसाठी केली आईची हत्या, नरभक्षक मुलाला उच्च न्यायालयाचा दणका

Bombay Highcourt: सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सुनील कुचकोरवी असे ‘नरभक्षक’ मुलाचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

latest Mumbai news: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईची हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाणाऱ्या मुलाला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला.

हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकार असल्याने आरोपीला माफी देता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवीत कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सुनील कुचकोरवी असे ‘नरभक्षक’ मुलाचे नाव आहे.

आईने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने सुनीलने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी तिची हत्या केली. केवळ हत्या करून न थांबता सुनीलने आईचे काळीज, आतडे, मेंदू आणि इतर अवयव काढून ते शिजवून खाण्याचा प्रयत्नही केला. रक्तबंबाळ अवस्थेतील आईच्या मृतदेहाशेजारी सुनील बसून असल्याचे शेजारच्या मुलाने पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती.

या घटनेमुळे कोल्हापूरसह त्यावेळी अवघ्या राज्यभरात खळबळ उडाली होती. जुलै २०२१ मध्ये कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पोलिसांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर दीर्घ सुनावणी घेतल्यानंतर न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आज निकाल जाहीर केला. सुनावणीच्यावेळी आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खंडपीठासमोर हजर करण्यात आले होते. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असून या गुन्ह्यातील आरोपीला माफी देता येणार नाही. त्याच्या वर्तनात बदल होण्याची शक्यताही नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT