Mumbai News 
मुंबई

Mumbai : साचलेल्या पाण्यातून चालत येत असताना मुलगा अचानक बेपत्ता; 26 तासानंतरही शोध लागेना

शर्मिला वाळूंज

डोंबिवली - गेल्या दोन तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने ठीकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच दिवा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. दिव्यात राहणारा 16 वर्षीय वसीम सय्यद हा मुलगा 26 तासापासून बेपत्ता आहे. दुकानात सामान आणण्यासाठी गेलेला वसीम हा परत आला असता घराजवळील रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होता.

यामुळे त्याने रस्त्यावर गाडी उभी करून पाण्यातून चालत जात असतानाच तो अचानक दिसेनासा झाला. पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेल्याची शक्यता असून अग्निशमन दल व पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वसीम बेपत्ता होऊन 26 तास उलटले आहेत मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही.

ठाण्यात गेल्या 24 तासात तुफान पाऊस झाला आहे. मुंब्रा, दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले असल्याने पावसाचं पाणी निचरा होण्यास जागा नाही. येथील नाले देखील अरुंद असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास नाले भरून वाहत असतात. बुधवारी झालेल्या पावसात दिवा परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यातच दिवा, खार्डी गाव येथील एम एस कंपाऊंड या ठिकाणी राहणार 16 वर्षीय वसीम सय्यद नावाचा मुलगा बुधवारी दुपारी 1 च्या सुमारास दुकानातून सामान आणण्यास स्कूटी वर गेला होता. मात्र घरी परतेपर्यंत घरी येणाऱ्या मार्गावर कमरे एवढं पाणी साचले होते.

पाणी जास्त प्रमाणात असल्याने व त्याला फोर्स देखील जास्त असल्याने वसीम याने आपली गाडी रस्त्यावरती उभी केली आणि कमरे एवढ्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला. मात्र पाण्याला वेग जास्त असल्याने तो अचानक दिसेनासा झाला. वसीम बेपत्ता झाल्याची माहिती त्याच्या घरच्यांना मिळताच घरच्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला याची माहिती दिली.

अग्निशामक दलाचे कर्मचारी, मुंब्रा पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वसीम याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाण्याच्या प्रवाहामुळे वसीम नाल्यात वाहून जाण्याची शक्यता असल्याने नाल्याची देखील पाहणी करण्यात आली. पावसामुळे व रात्रीच्या अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत होते. गुरुवारी सकाळी देखील वसीम चा शोध सुरू होता.

अग्निशमक दल कर्मचारी आता दिवा परिसरातील मोठे नाले व जवळील दिवा खाडीत तरुणाचा शोध घेत आहे. या घटनेला 26 तास उलटून गेले असून पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. तरीही परिसरातील पाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष असून महानगरपालिकेच्या नाले सफाईवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे वसीमच्या नातेवाईकांनी परिसरामध्ये गटार कमी असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात भरत असल्याचा आरोप करत महानगरपालिकेने परिसरात गटार बांधावे अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT