clean up marshal mumbai  sakal
मुंबई

Mumbai Breaking: रेल्वेस्थानकांवर घाण करणाऱ्यांवर होणार कारवाई ; क्लीनअप मार्शलची होणार नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Breaking: मुंबई महापालिकेच्या अपयशी प्रयत्नानंतर आता मध्य रेल्वेने क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेस्थानक आणि गाड्यांत थुंकणारे, घाण करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी त्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती लोकमान्य टिळक टर्मिनसवर करण्यात येणार आहे. याकरिता निविदा काढण्यात आल्‍या आहेत.

मुंबई विभागातील रेल्वेस्थानकांवर किंवा धावत्या गाडीत थुंकणाऱ्या आणि कचरा करणाऱ्या प्रवाशांविरोधात अनेकदा रेल्वेकडून कारवाई करण्यात येते. याशिवाय ‘थुंकू नका’ अशी उद्‌घोषणा करण्यात येते; मात्र थुंकणाऱ्यांची आणि रेल्वे परिसरात कचरा करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. तसेच प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी रेल्वेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने निविदा मागवल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अशी होणार कारवाई

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सकाळ’ला सांगितले की, भारतीय रेल्वेचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते विशेष भारतीय रेल्वे अधिनियामांतर्गत अधिकृत दंड आकारणार आहेत. त्‍यांची नियुक्‍ती केवळ कारवाईसाठी नाही तर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती आणि रेल्वे प्रवाशांना मदत करण्यासाठी होणार आहे. त्‍यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

खासगी कंपनीची नियुक्‍ती

रेल्‍वे प्रशासन क्‍लीनअप मार्शलसाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देणार आहे. सध्या हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास मुंबईतील सर्व मोठ्या स्थानकांवर टप्प्याटप्प्यांनी क्‍लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचे नियोजन असल्याची माहिती रेल्‍वे अधिकाऱ्याने दिली आहे.

पाकिकेची योजना अयशस्‍वी

मुंबई महापालिका प्रशासनाने काही वर्षांपासून मुंबईतील रस्त्यांवर थुंकणारे, घाण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र क्लीनअप मार्शलनी वसुलीचा धंदा सुरू केल्याच्या मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून तक्रारी आल्या होत्या. याशिवाय नागरिक आणि क्लीनअप मार्शलच्या मारामारीच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने क्लीनअप मार्शल बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT