Mumbai Local Sakal
मुंबई

Mumbai Breaking: तब्बल १० दिवस या मार्गावर मेगाब्लॉक ; २५० लोकल रद्द

सकाळ डिजिटल टीम

Western Railway News: मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पश्चिम रेल्वेवर 25 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवली या मार्गीकीचे काम करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी तब्बल २५० लोकल रद्द करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. याचबरोबर 61 मेल गाड्या देखील रद्द करण्यात येणार आहेत.

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. लोकल थोडीही उशिरा धावली तरी पण मुंबईचा अख्ख गणितच बिघडतं. यामुळे लोकलने प्रवास करण हे मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाचं असत. यातच आता पश्चिम रेल्वेवर तब्बल 10 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होणार यात काही वाद नाही.

तर दुसरीकडे मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मुंबई सेंट्रल बोरिवली या मार्गिकेचे काम हातात घेतल्यामुळे हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचे हाल जरी होणार असले तरी येत्या काळात होणाऱ्या या कामामुळे मुंबईकरांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.

या मेगाब्लॉक दरम्यान तब्बल 61 लांब पल्ल्याच्या (Expess) गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर २५० लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी देखील दहा दिवस प्रवास करताना स्वतःची काळजी घेऊन, प्रवासाचं नियोजन कारण अतिशय महत्वाचं असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : नागपूर पोलीस आयुक्त नांगरे-पाटलांना काँग्रेसनं भेट दिली संविधानाची प्रत

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT