Bribe Case esakal
मुंबई

Bribe Crime : पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी व एजेंटला लाच घेताना अटक

मुंबईत पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याला आणि त्याच्या एजेंटला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईत पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याला आणि त्याच्या एजेंटला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आली आहे.

मुंबई - मुंबईत पासपोर्ट कार्यालयातील कर्मचाऱ्याला आणि त्याच्या एजेंटला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आली आहे. कर्मचारी प्रकाशकुमार मंडल आणि त्याचा एजेंट शेखर नेवे असे अटक करण्यात आलेल्याची नावे आहे. पासपोर्ट नुतनीकरणासाठी तब्बल 1 लाख 85 हजार रूपयांची आरोपीकडून लाच मागण्यात आली. तडजोडीनंतर 85 हजाराचा व्यवहार ठरला होता. लाचेचा पहिला 45 हजाराचा हफ्ता घेताना आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या प्रकरणात तक्रारदार व्यक्तीच्या पासपोर्टचे नुतनीकरण करायचे होते. नुतनीकरणात काही तांत्रिक कारणांमुळे त्यांच्या पासपोर्ट बीकेसी बांद्रा येथील पासपोर्ट कार्यालयात प्रलंबित होता. त्यावेळी आरोपी शेखर नेवे यांने तुमचे काम करून देतो सांगून बीकेसी बांद्रा येथील पासपोर्ट कार्यालयातील डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल यांना 1 लाख 80 हजार रूपये आणि स्वतःसाठी 5 हजार रूपयांची लाच मागितली.

त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल यांना 80 हजार आणि स्वतःकरिता पाच हजार रूपये असा व्यवहार नेवे याने ठरवला. त्यानुसार पहिला हफ्ता देण्याचे ठरले.डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल याला 40 हजार आणि शेखर वे याला 5 हजार रूपये असा व्यवहार ठरला. पैसे घेण्यासाठी शेखर नेवे रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलात आला होता. तेव्हा त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.त्यानंतर तातडीने डाटा ऑपरेटर प्रकाशकुमार झरी मंडल याला मुंबईत अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT