मुंबई

हायस्पीड बुलेटला महाराष्ट्रात 'स्लो'स्पीडची बाधा; राज्यात फक्त 'इतकी' टक्के जमीन अधिग्रहीत

संजयघारपुरे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत अनेकदा चर्चा होत असते, पण या प्रकल्पाची महाराष्ट्रातील गती कमालीची स्लो आहे. या प्रकल्पासाठी हवी असलेल्या जागेपैकी 23 टक्के जागाही प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात आलेली नाही. दी नॅशनल हाय स्पीड रेल कार्पोरेशन हा बुलेट ट्रेन प्रकल्प अमलात आणत आहे. महाराष्ट्रात एकंदर 431 हेक्टर जागा आवश्यक आहे. त्यातील 100 हेक्टर जागाच ताब्यात घेण्यात आली असल्याचे वृत्त आहे. या प्रकल्पाचा एकंदर 97 गावांना फटका बसणार आहे.

महाराष्ट्रात 23 टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये 70 टक्के आणि दादरा नगर हवेतील 80 टक्के जागा ताब्यात घेण्यात आली असल्याचे कार्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी सांगितले. मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन एकंदर 508 किलोमीटर धावणार आहे. त्यातील 155 किमीचा प्रवास महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून आहे. यापैकी 66 हेक्टर सरकारची जमीन आहे, तर 267.55 हेक्टर खाजगी जमीन आहे. या शिवाय 97 हेक्टर जागेवर वनखात्याचा ताबा आहे. उर्वरीत जमीनीचा ताबा रेल्वेकडे आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेले जमिनीच्या सर्वेक्षणाचे संयुक्त काम जवळपास पूर्ण झाले आहे.

महाराष्ट्रात या बुलेट ट्रेनसाठी ताब्यात घेतल्या गेलेल्या 100 हेक्टर जमिनीपैकी 40 टक्के ठाण्यातील, 13 टक्के पालघरमधील तर 19 टक्के मुंबईतील आहे. सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी 2019 डिसेंबर ही मुदत निश्चित केली होती. मात्र महाराष्ट्रातील शेतकरी आणि आदिवासींचा या प्रकल्पास कडवा विरोध आहे. त्यामुळे जमीन ताब्यात घेण्यास उशिर होत आहे. रेल्वेने या प्रकल्पातील 508 किमीपैकी 345 किमीसाठी यापूर्वीच निविदा काढली आहे. त्यानुसार या मार्गावर सहा स्थानके असतील. त्यातील मुंबईतील स्थानक भूमीगत असेल. याचबरोबर 28 स्टील पूलांच्याही निविदा काढण्यात आल्या आहेत.

----------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT