Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील उपाययोजनेचा बोजवारा; जानेवारी ते जून दरम्यान एकूण ७० अपघातामध्ये ३७ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Mumbai - मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावरील गंभीर अपघातांमूळे मृत्युच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. सामाजिक संस्था, महामार्ग पोलीस, परिवहन विभागाच्या माध्यमातून राज्य सरकार विविध उपाययोजना करत असल्याचे सांगितल्या जात असून,

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यास अपयशी ठरतांना दिसून येत आहे. २०२०-२०२१ मध्ये कोरोना महामारीच्या लाॅकडाऊनमूळे काहीप्रमाणात अपघात आणि मृत्युमध्ये घट झाली होती. मात्र, पुन्हा आता अपघात आणि मृत्युमध्ये वाढ दिसून आली आहे.

वर्ष २०२२ मध्ये वर्षभरात १९८ अपघात झाले असून, ७३ प्राणांतीक अपघातामध्ये ९२ लोकांनी आपला जीव गमवला आहे. धक्कादायक म्हणजे वर्ष २०१८ मध्ये एकूण ३५९ अपघात झाले होते. त्यातील १०० प्राणांतीक अपघातामध्ये ११४ मृत्यु झाले होते. तर २०१९ मध्ये ३५३ एकूण अपघात होऊन ७४ प्राणांतीक अपघातामध्ये ९२ मृत्यु झाले,

त्यानंतर दोन वर्ष कोरोनाच्या लाॅकडाऊनमूळे अपघात आणि मृत्युच्या संख्येत घट झाली. मात्र, पुन्हा २०२२ मध्ये एकूण अपघात घटले असतांना प्राणांतीक अपघातांमध्ये ९२ मृत्यु झाल्याची नोंद असल्याने चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यावर्षी जानेवारी ते जुन या सहा महिन्यात सुद्धा चिंताजणक अपघात आणि मृत्युची आकडेवारी पुढे आली आहे. एकूण ७० अपघात झाले असून, २६ प्राणांतीक अपघातामध्ये ३७ लोकांचा बळी गेला आहे.

तर २० गंभीर अपघातांमध्ये ५४ लोकांना गंभीर दुखापती, अंपगत्व आले आहे. ७ किरकोळ अपघातात १९ लोकांना दुखापती झाली आहे. तर १७ अपघातात कोणतेही नुकसान झाले नाही. त्यामूळे येत्या काळात राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ठोस उपाययोजना न केल्यास येत्या सहा महिन्यात पुन्हा अपघाताची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यातीलप्रचार थंडावला! देशातील ५७ मतदारसंघांत शनिवारी मतदान

Pune Porsche Accident : अपघातानंतर पळून जाण्याचे कारण काय? विशाल अग्रवाल यांची पोलिसांकडून कसून चौकशी

Dombivli MIDC Blast : डोंबिवली MIDC दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत; CM एकनाथ शिंदेंची घोषणा

Pune Porsche Accident: '...तर तुला मारून टाकेन'; कल्याणीनगर अपघातातील आरोपीच्या आजोबाचं आणखी एक अंडरवर्ल्ड कनेक्शन आलं पुढे

SCROLL FOR NEXT