sakal
मुंबई

मुंबई: फ्लेमिंगो, खारफुटींना सीसीटीव्हीचे संरक्षण

एमएमआर क्षेत्रातील पाच विभागांमध्ये कॅमेरे बसवणार

मिलींद तांबे

मुंबई: असामाजिक घटकांचा फटका निसर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मुंबईतील खारफुटींवरील झालेले अतिक्रमण हे त्यापैकीच एक. परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांनाही या असामाजिक घटकांच्या उपद्रवाचा फटका बसतो. यातून खबरदारी घेत खारफुटी विभागाकडून फ्लेमिंगो आणि खारफुटींच्या संरक्षणासाठी मुंबई महानगर प्रदेश परिसरात १०० ठिकाणी (एमएमआर) २५० सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. पुढील वर्षभरात हे काम पूर्ण करण्यात होणार असून, यामुळे खारफुटीसह फ्लेमिंगो पक्ष्यांना संरक्षण मिळणार आहे.

एमएमआरमध्ये मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात खारफुटीचे मोठे जंगल आहे. यातील बऱ्याच ठिकाणी परदेशातून फ्लेमिंगो पक्षी देखील येत असतात. यामुळे निसर्ग अधिक खुलून येतो. त्यातून निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार बघायला मिळतात. मात्र अलीकडे खारफुटीची तोड होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. खाडी परिसर तसेच खारफुटींच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्यही वाढले आहे.

याचा परिणाम फ्लेमिंगो पक्ष्यांच्या संख्येवर देखील झाला आहे. हे सर्व रोखण्यासाठी मुंबई, ठाणे, भिवंडी, नवी मुंबई परिसरात अत्याधुनिक सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. निसर्गाची सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागार समिती नेमण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण देखील सुरू करण्यात आल्याची माहिती मँग्रोव्हज सेलच्या उप मुख्य वनसंरक्षक निनू सोमराज यांनी दिली.

तीन प्रकारचे कॅमेरा

खारफुटी परिसरातील प्रत्येक हालचालींची नोंद व्हावी यासाठी तीन प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत. नंबर प्लेट डिटेक्शन कॅमेरा, ३६० वर्तुळात फिरणारा कॅमेरा आणि झुमच्या माध्यमातून बारीक बारीक वस्तू टिपणारा कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

कुठे किती कॅमेरे

  • मुंबई शहर ७०

  • मुंबई उपनगर ७०

  • ठाणे ४०

  • भिवंडी ३०

  • नवी मुंबई ४०

खारफुटीसह फ्लेमिंगो पक्ष्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. सीसी टीव्ही कॅमेरा बसवण्याच्या प्रकल्पासाठी आणखी एक सल्लागार नेमला आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून वर्षभरात प्रकल्प पूर्ण करू. - वीरेंद्र तिवारी, मुख्य वनसंरक्षक, मँग्रोव्हज सेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT