jail  sakal
मुंबई

Mumbai : कारागृहात बंद्यांना विवस्त्र करणे निंदनीय!

झडतीवरून न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला खडे बोल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कारागृहात बंदिवानाची झडती घेताना त्यांना विवस्त्र करणे म्हणजे मूलभूत खासगी अधिकाराचा भंग आहे, असे खडे बोल विशेष न्यायालयाने कारागृह प्रशासनाला सुनावले. अशा प्रकारचे वर्तन अत्यंत असंसदीय आणि निंदनीय आहे, अशा शब्दांत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

आरोपी शेख याने विशेष न्यायालयात केलेल्या याचिकेवर विशेष मोक्का न्या. बी. डी. शेळके यांनी निकाल दिला आहे.शेख बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहे. त्याच्यासह अन्य काही बंद्यांनीही अशा प्रकारची तक्रार न्यायालयात केली असून न्यायालयाने वेळोवेळी प्रशासनाला ताकीद दिली आहे.

न्यायालयीन सुनावणीसाठी शेखला कारागृहाबाहेर नेण्यात आल्यानंतर परतल्यावर नेहमी सर्व कर्मचारी आणि कैद्यांसमोर त्याला विवस्त्र करून झडती घेतली जाते, असे त्याने याचिकेत नमूद केले आहे. अत्यंत घाणेरड्या शब्दांत झडती घेताना कर्मचारी हिणवतात आणि अपमानित करतात, अशी तक्रारही त्याने केली आहे.

सर्व प्रकारावर न्यायालयाने निकालपत्रात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने शेखच्या दाव्यांना विरोध करत आरोप फेटाळून लावले. मात्र याचिकादारासह अन्य अनेक बंद्यांनीही अशी तक्रार केल्याचे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. अशी कृती अपमानास्पद असून बंद्यांच्या खासगी जगण्याच्या अधिकारावर आक्रमण करणारी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

तपासणीसाठी स्कॅनर वापरा

कारागृह कर्मचाऱ्यांनी यापुढे स्कॅनर आणि अन्य तपास साधने बंद्यांची तपासणी करताना वापरावीत, असे निर्देश न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले आहेत. जर अशी साधने उपलब्ध नसतील, तर कपडे न उतरवता सभ्यपणे आणि असभ्य भाषा न वापरता तपासणी करावी, असेही आदेश कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

SCROLL FOR NEXT